ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं खासदार सुनेत्रा पवार यांचा पंढरपूर येथे सत्कार…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२६ मे
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार हे संपूर्ण महाराष्ट्रसह विविध राज्याचा दौरा करीत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना शिक्षण आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरित करण्याचे दृष्टीने त्यांचा दौरा हा महत्त्वपूर्ण होता. मागील वीस वर्षापासून महिला सबलीकरण व महिलांच्या आर्थिक विकासासाठी खा.सुनेत्रा पवार हे कार्यरत आहेत. सोलापूर दौऱ्यावर आल्या असता त्यांनी, श्री विठ्ठल रुक्माईची मनोभावे दर्शन घेतले.

दरम्यान, केंद्राच्या संसदीय समितीमध्ये त्यांची निवड झाल्यानिमित्त ईच्छा भगवंताची परिवाराच्यावतीनं त्यांचं विशेष सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास किसन जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा अशा सूचना देखील यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी किसन जाधव यांना दिल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाअध्यक्षा वर्षाराणी शिंदे, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक सुरेश पालवे, सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, शहर सरचिटणीस संतोष गायकवाड,महादेव राठोड, आनंद गाडेकर आदींसह इच्छा भगवंताची मित्रपरिवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.