लाडक्या बहिणींची साथ देणारे हे एकमेव उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित पवार – संगीता जोगधनकर..!
महिला आर्थिक सक्षम तर देश सक्षम हे ब्रीद लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणीसाठी योजना राबविली – किसन जाधव..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर , दि. १८ सप्टेंबर – अख्या महाराष्ट्र लाडक्या बहिणीमय झाला आहे. अर्थसंकल्प मांडताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलाही सक्षम झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केल्यानंतर लाडक्या बहिणीने देखील उस्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ थेट लाभार्थी महिलेच्या बँकेच्या खात्यावर जमा झाले. केवळ आणि केवळ फक्त अजित पवारांमुळे या योजनेला चालना मिळाली आहे.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर रेल्वे लाईन्स, सोनामाता शाळेसमोरील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर पिंक वॉलच्या माध्यमातून शेकडो लाडक्या बहिणीने आपली सही करून अधिक पवारांचे कृतज्ञतापर आभार मानले. यावेळेस लाडक्या बहिणींचे अजित पवार हेच खरे लाडके भाऊ अशा जोरदार घोषणा त्यांनी दिल्या. याप्रसंगी किसन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर, लक्ष्मी पवार, शोभा गायकवाड, प्रमिला स्वामी, संगीता गायकवाड, मीना जाधव, मारता आसादे, सरोजनी जाधव, पुष्पा नाईकवाडी, लता भोसले, हिराबाई शेख, मालती साळुंखे, सफिया शेख, मोनिका रेशमा सोनवणे, श्रीदेवी सोनवणे, बेलदारे, विदर्शना वाघमारे सुनीता यमकोटे, संतोषी मिसाळ, सुनिता होटकर, सुलोचना हांडे, मोहिनी पवार, वैशाली सोनवणे यांच्यासह शेकडो लाडक्या बहिणींनी उपस्थिती लावली होती. याप्रसंगी राष्ट्रवादीचे महिला पदाधिकारी कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.
राज्यातील लाडक्या बहिणींचे अजित पवार हेच खरे लाडके भाऊ…
महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची साथ देणारे अजित पवार हेच लाडक्या बहिणीचे लाडका भाऊ असून गरीब कुटुंबातील महिलांच्या दृष्टीने दीड हजार रुपयांचे मूल्य खूप मोठे आहे. हे अनेकांना माहित नाही अजित पवारांनी राबवलेली ही योजना आमच्या दृष्टीने खूप महत्वकांक्षी योजना असून, या योजनांचा लाभ देखील समस्त राज्यातील लाडक्या बहिणीने घेतला. या निमित्त ही योजना महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेमुळे सर्वसामान्य महिलाही आर्थिक सक्षम झाली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कृतज्ञतापर आभार व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
– संगीता जोगधनकर , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष.
पिंक वॉलच्या माध्यमातून सह्या करून आपला आनंद द्विगुणित केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभावीपणे राबविली. महिला आर्थिक सक्षम तर देश सक्षम हे ब्रीद लक्षात घेऊन अजित पवारांनी राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे प्रत्यक्षात अमलात आणली. या योजनेतून लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा झाले, असून त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्याकडून मिळणारे प्रेम पाहिल्यानंतर मनाला समाधान मिळत आहे. लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद असाच कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनसह इतरही योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून यापुढेही कायमस्वरूपी सुरू राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापर आभार मानण्यासाठी आज आपल्या कार्यालयासमोर पिंक वॉलच्या माध्यमातून सह्या करून आपला आनंद द्विगुणित केला.
– किसन जाधव , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य.