अवंतीनगर येथील नवीन रेल्वे बोगद्यातून जाणारा वजनदार पीकअप कोसळला ; सुदैवाने जीवितहानी टळली
रेल्वे बोगदा झाला परंतु धोकादायक रस्ता अपूर्णच ; तात्काळ रोड करण्याची स्थानिक नागरिकांनी केली मागणी !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज
आमराईहून अवंतीनगरकडे येणारे पिकअप वाहन क्रमांक एम.एच.१५ जे.सी.५०७९ नवीन रेल्वे बोगद्यातून वरच्या बाजूला जाताना अचानक कोसळले. गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप वजनदार गाडी एका बाजूला झुकून सदरचा अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, सकाळी पावणे नऊ वाजता सदरचे पिकअप वाहन आमराईहून आवंती नगर कडे जात होते. जेव्हा सदरचे वजनदार वाहन अवंती नगर येथील नवीन रेल्वे बोगद्या खालून वर जाताना चढामुळे वजनदार वाहनाचा ताबा सुटला. हॅन्डब्रेक लावून देखील गाडी मागे सरकत गेली आणि कच्चा रस्त्यावरून एका बाजूला झुकली. त्यामुळे वाहन मातीच्या ढिगार्यावरून खाली कोसळले..गाडीमध्ये गीतांजली दुकानातील ऑइल पेंटचे डबे भरले होते. सदरचे डबे गीतांजली दुकानांमध्ये उतरवण्यात येणार होते. लातूरहून गाडी सोलापूरकडे दाखल झाले होती. सदरचे पिकप वाहन अनलोड करण्यापूर्वीच या रस्त्यावर अपघात झाला. सदरच्या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र थोड्याफार प्रमाणात वित्तहानी झाल्याचे सांगण्यात आले. दुसरे वाहन बोलवून ऑइल पेंटचे डब्बे बाहेर काढण्याचे कामकाज सुरू करण्यात आले.
रेल्वे बोगदा झाला परंतु धोकादायक रस्ता अपूर्णच
रेल्वे प्रशासनाने सदरचा रेल्वे ब्रिज तयार केला. त्यानंतर रेल्वे मुलाखडून जाणाऱ्या वाहनांसाठी बोगदा करण्यात आला. परंतु या बोगद्याला जोडणारा रस्ता हा अद्यापही तयार करण्यात आलेला नाही. मातीचे ढिगारे मोठ मोठ दगडे तशाच अवस्थेत पडून आहेत. वाहने ये जा करत आहेत यामुळे या रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भविष्यामध्ये असा एखादा अपघात होण्याचा धोका संभवत आहे. त्यामुळे महापालिकेने तात्काळ येथे रस्ता तयार करावा अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.