सोलापूर व्हिजन – विवाहिता ही सासरी नांदत असताना सासरकडील मंडळींनी शारीरिक आणि मानसिक छळ करत माहेरून महिन्याकाठी १२ हजार रुपये आण, नाहीतर तुला नांदवणार नाही असे म्हणून वेळोवेळी हाताने मारहाण करत शिवीगाळ करून जाचहाट केले.
अशा आशयाची फिर्याद श्वेता सागर लहांडे (वय-२५, रा. जयलक्ष्मी सोसायटी, शेळगी) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती सागर लहांडे, सासू मीना लहांडे, पतीचे काकू उमा लहांडे, काका शंशीकांत लहांडे, आत्या रेखा लहांडे, मामा किरण रणसुभे, प्रियंका रणसुभे,प्रदिप रणसुभे (रा. सर्व.दक्षिण कसबा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.ही घटना २१ नोव्हेंबर २०२१ ते आजतागायत पर्यंत फिर्यादी यांच्या सासरी शेळगी येथे घडली .पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड हे करीत आहेत.