पालकमंत्री जय भाऊ अन् खा.प्रणिती शिंदे यांच्यात रंगले वाक्ययुद्ध ; शिंदेंच्या पत्रानंतर लागला कलगीतुरा

गिरेंगे तो पैर उपर ; पालकमंत्री जया भाऊंची खोचक टीका 

तर पालकमंत्र्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नसल्याचे खा. प्रणिती शिंदे वक्तव्य 

परभावानंतर शिंदेंच्या पत्रावर लागला कलगीतुरा  

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२० जानेवारी

पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यात महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर वाक्ययुद्ध सुरू झालेले दिसत आहे. पालकमंत्र्यांच्या खोचक टीकेला खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत विरोधकांचा धुवा उडवत भाजपने सोलापूर महापालिकेत ७५ पार करत ८७ जागा मिळवत घवघवीत यश प्राप्त केले. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या वाट्याला केवळ दोन जागा आल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्र लिहिले. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरस झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी त्याचा खरपूस समाचार घेताना, पन्नास फूट खाली पडले तरी पाय वरतीच आहेत असे हिंदीत बोलल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे दिसून आले. “दो कदम पीछे नही, पचास कदम नीचे गिरे तो भी पैर उपर ! अशी खोचक टीका पालकमंत्र्यांनी केली होती. प्रणिती शिंदे या मोठ्या नेत्या आहेत. दिल्लीत बसून ते शहरातील राजकारणात लक्ष घालतात. काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांच्या जवळ ते आहेत. त्यामुळे अशा दूरदृष्टी ठेवणाऱ्या नेत्या शहराला लाभल्या आहेत. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील भाजप सरकार बसेल असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

 

दरम्यान, यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर देताना पालकमंत्री हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मी पत्र लिहिले होते. त्यामुळे त्यांनी ते वाचले असावे. परंतु त्यातून पालकमंत्र्यांनी वेगळा अर्थ काढला असावा. म्हणून त्यांच्या बोलण्याकडे मी फारसे लक्ष देत नाही. सत्ता पहिल्यांदाच पाहत असल्यामुळे त्यांच्या तोंडून असे वाक्य निघत आहेत. ते केवळ संधी साधू आहेत. भाजपने त्यांना मोठ्या आमिष दिले असावे, म्हणून ते असे वागत आहेत. अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांची खोचक टीका उडवून लावली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *