आयाराम गयाराम असे न म्हणता त्यांना आदरपूर्वक बोलवे  पालकमंत्र्यांचा इशारा ;महापौर निवडीअगोदर पालकमंत्र्याचे सूचक वक्तव्य

महापौर निवडीअगोदर पालकमंत्र्याचे सूचक वक्तव्य –

आयाराम गयाराम असे न म्हणता त्यांना आदरपूर्वक बोलवे  पालकमंत्र्यांचा इशारा 

भाजपच्या नूतन नगरसेवकांची बैठक संपन्न 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२४ जानेवारी

सोलापूर महानगरपालिका महापौर पदाची उत्सुकता आणि उत्कंठा शिगेला पोहोचली असताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपच्या नूतन नगरसेवकांच्या बैठकीत महापौर निवडीवर सूचक वक्तव्य केले आहे. आयाराम गयाराम असा उल्लेख न करता भाजपचे सदस्यत्व स्वीकारून ते नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे त्यांना आदरपूर्वक वागणूक द्यावी. आदरपूर्वक बोलावे असा सूचक इशारा पालकमंत्र्यांनी केल्याने महापौरपदी कोण विराजमान होईल ? याचे कोडे उलगडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

           दरम्यान, महापौर पदाच्या रेसमध्ये चार टर्म नगरसेवक राहिलेले विनायक कोंड्याल आघाडीवर आहेत. त्यांच्यासोबत डॉ. किरण देशमुख आणि नरेंद्र काळे यांचे नाव देखील शर्यतीत आहे. मात्र आज झालेल्या बैठकीत नरेंद्र काळे यांना गटनेत्याची ऑफर आल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली. मात्र ते या पदासाठी इच्छुक नसल्याचे देखील सांगण्यात आले. तर दुसरीकडे नगरसेवक डॉ. किरण देशमुख हे देखील या बैठकीत दिसून आले नाही. त्यामुळे विनायक कोंड्याल यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले जात आहे.

     पालकमंत्र्यांनी पत्रकारांना संबोधित करताना, आपण वापरत असलेली भाषा जपून वापरावी. आयाराम गयाराम हे शब्द प्रत्येक ठिकाणी वापरू नये. “आपण जर एखादे वृत्तपत्र बदलले तर आम्ही तुम्हाला काय बोलावे”असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी केला. त्यांच्या बोलण्यातून असे दिसून आले की, सोलापूरचा महापौर आपसूक कोण आहे हे सांगून गेले. त्यामुळे भाजपच्या गोठात कोंड्याल यांच्या नावाची एकच चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

     त्याच पद्धतीने गटनेते पदी बिजू प्रधाने यांचे नाव देखील ऐकण्यास मिळत आहे. त्यामुळे प्रधाने यांच्या भोवती गटनेते पदाचे वलय निर्माण झालेले दिसत आहे. मात्र प्रधाने यांनी आपण कोणत्याही पदाची मागणी केली नसल्याचे सांगितले. तरीदेखील यांचे नाव आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

नगरसेविका पती बाहेर पाडताना…

       तत्पूर्वी, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी नूतन नगरसेवकांचे सारस्वत मंगल कार्यालय येथे स्वागत केले. त्यानंतर नूतन नगरसेवकांनी आपले मनोगत व्यक्त करताना विजयाचे श्रेय आपल्या कार्यकर्त्यांना तसेच घरच्या मंडळींना दिल्याचे सांगितले. काही नगरसेवक हे पहिल्यांदाच जिंकून आल्याने त्यांनी आपल्या भावना अधिक प्रखरतेने मांडल्या.

 

नूतन नगरसेवक शिवाय सभागृहात कोणी बसायचे नाही भाजपा शहराअध्यक्षांच्या सूचनेनंतर नगरसेवकांच्या पतींना तसेच इतर कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या बाहेर उभारावे लागले. दरवाजा बंद करून बैठक संपन्न करण्यात आली. पंधरा ते वीस मिनिटांच्या बैठकीनंतर दरवाजा उघडण्यात आला आणि पालकमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकी संदर्भातील कामकाजासाठी रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार देवेंद्र कोठे, मनीष देशमुख, नूतन नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *