पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले रूपाभवानी मातेचे दर्शन !
सोलापूरच्या सुखसमृद्धीसाठी घातले साकडे….!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.०४ ऑक्टोंबर – जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांनी नवरात्रोत्सवानिमित्त सोलापूर ची कुलस्वामिनी रूपाभवानी मातेचे दर्शन घेऊन सोलापूरच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घातले.
यावेळी सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी देवीच्या दर्शनासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील सहकुटुंब मंदिरात आले होते. यावेळी ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ (तम्मा) मसरे यांच्या हस्ते श्री रूपाभवानी देवीची प्रतिमा देऊन पालकमंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मानकरी राजशेखर हिरेहब्बू, आप्पासाहेब बिराजदार, बाळासाहेब मुस्तारे आदी उपस्थित होते