श्रींच्या चरणी पाचशे किलो मोतीचूर लाडू अर्पण….!
पाणीवेस गणपती गणेशोत्सव मंडळाने केली मोतीचूर लाडूंची सजावट …..!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर , दि. १५ सप्टेंबर – गणेश चतुर्दशीला गणेश भक्तांच्या घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर , गणपती बाप्पाने भक्तांच्या घरोघरी पाहुणचार घेतला , आता गणपती बाप्पाच्या निरोपाची वेळ समीप आली आहे. अवघ्या एक दिवसांवर गणपती विसर्जन येऊन ठेपले आहे. तत्पूर्वी याच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेश भक्तांच्या वतीने गणेशोत्सव काळात विविध उपक्रम घेण्यात आले. श्रींची यथासांग महापूजा करण्यात येऊन श्रींना नैवेद्य अर्पण करण्यात आला. याच निमित्ताने मानाचा पाणीवेस गणपती चरणी गणेश भक्तांच्या वतीने रुचकर असे पाचशे किलोचे मोतीचूर लाडू अर्पण करण्यात आले. श्रींच्या सभोवताली मोतीचूर लाडूंची सजावट करण्यात आली होती. श्रींची आरती झाल्यानंतर मोतीचूर लाडूंचे प्रसाद स्वरूपात भक्तांमध्ये वाटप करण्यात आले.
यासाठी उमेश कुरुलकर, व्यंकटेश झुंजे , शुभम तिवारी , अभिषेक कुरुलकर , अनीश पवार , श्रेयस कुरुलकर , समर्थ जाधव , निरंजन पवार , निखिल झुंजे यांचे विशेष सहकार्य लाभले. तर पाणीवेस तालीम गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सजावट करण्यासाठी परिश्रम घेतले.