पंढरपूर 65 एकर प्लॉट वाटप बाबत कायमचा तोडगा काढणार – मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचे वारकरी मंडळाला आश्वासन : पंढरपूर 65 एकर प्लॉट वाटप बाबत कायमचा तोडगा काढू

सोलापूर दि 28 जून – पंढरपूर 65 एकर प्लॉट वाटप संदर्भात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ह भ प सुधाकर महाराज इंगळे यांनी अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातुन अमोल  शिंदे यांच्या प्रयत्नाने निवेदन दिले . त्यावेळी त्यांनी असे म्हटले की, त्यासंबंधी कायमचा तोडगा काढणार आहे . एकाच दिवशी एकाच वेळी प्लॉट वाटप व्हावे , असे तानाजी सावंत यांनी म्हटले. त्यांना पुढील प्रमाणे लेखी निवेदन देण्यात आले.

श्री क्षेत्र पंढरपूर येथे वर्षभरात चार वारीला वारकरी भाविक 65 एकर मधील प्लॉट घेऊन तीन ते पाच दिवस नित्य नेम करणेसाठी मुक्कामी राहतात. पूर्वी नदी वाळवंटामध्ये रहात होते. परंतू स्वच्छतेचे कारण समोर आले आणि सर्वांना 65 एकर मधील प्लॉटमध्ये राहणेसाठी ती जागा खुली केली आहे असे कोर्टात सांगण्यात आले आहे. पण 65 एकर मधील प्लॉट घेणेसाठी वारकरी भविकाना खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक वारीला प्लॉट घेणेसाठी स्वतंत्र नविन अर्ज करावा लागत आहे. प्रत्येक वारीला 65 एकर मध्ये दिंडी वेगवेगळी असते. प्रत्येक वारीला त्या त्या दिंडीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भविकाना मंडप सापडणे, दिंडी मिळणे कठीण होत आहे . एका दिंडीला एका वर्षात फक्त तीन ते पाच दिवस तो प्लॉट अपेक्षीत आहे.

वारी कालावधीत अपेक्षित दिंडी 

 आषाढी – 450 ते 500

 कार्तिक – 250 ते 300

 माघवारी -350 ते 400

 चैत्रवारी – 200 ते 250

 65 एकर मध्ये प्लॉट अपेक्षित मागणी खालील प्रमाणे…

65 एकर मधील प्लॉट हा त्या त्या दिंडीला कायम स्वरुपी निश्चित करण्यात येऊन नोंदणी अर्ज एकदाच घेऊन त्यांची नोंद कायम स्वरुपी करण्यात यावी व तसे पत्र प्रत्येक दिंडीला देण्यात यावे.

 प्रत्येक प्लॉट सिमेंट काँक्रिट करण्यात यावा.

प्रत्येक प्लॉटवर पत्राशेड उभे करण्यात यावेत.

 आणखी 100 एकर जागा वारीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी.

 65 एकर मध्ये वारी कालावधीत स्वतंत्र पोलिस चौकी असावी.

 65 एकर मध्ये स्वच्छ व फिल्टर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे.

 65 एकर मध्ये परिसर स्वच्छ रहावा यासाठी स्वतंत्र कक्ष असावा.

 65 एकर ही जागा वारकरी दिंडीना कमी पडते म्हणून वारी कालावधीत तेथे इतर कोणालाही जागा देऊ नये.

                 65 एकर मधील प्लॉट संदर्भात खूप त्रास होत आहे. तो संपवून भाविकांना वारी कालावधी मध्ये नित्यनेम घडावा यासाठी सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तानाजी सावंत शिवाजी सावंत आमोल  शिंदे यांच्या प्रयत्नाने सह्याद्री अतिथीगृह , मुंबई येथे निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *