पंडित दीनदयाल उपाध्याय – एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव जिल्हास्तरीय समितीमध्ये प्रशांत बडवे व ज्योती मोरे यांची निवड
प्रतिनिधी सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.६ जून
महाराष्ट्र शासनातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शनाचा लोक कल्याणकारी विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सव समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचे कार्य, विचारप्रणाली व एकात्म मानव दर्शन, शालेय विदयार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, कामगार, सनदी लेखापाल आध्यात्मिक क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्ती, इत्यादी घटकांपर्यंत पोहोचविण्या करीता किमान १ लाख पुस्तके प्रकाशित करणे, तसेच विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करणे. यासाठी राज्यस्तरीय समितीप्रमाणे जिल्हास्तरावर “एकात्म मानव दर्शन” हीरक महोत्सव समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हि समिती काम करेल. सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते, साहित्य, नाट्य इ क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे प्रशांत बडवे तसेच बार्शीच्या प्राध्यपिका, सामाजिक कार्यकर्त्यां ज्योती मोरे हे या समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून काम करतील.