सोलापुरात पी.एन.जी सन्सचे सर्वांत मोठे ज्वेलरी दालनाचे थाटात उद्घाटन…!
पारंपरिक, डिझायनर दागिन्यांचे क्यूरेटेड कलेक्शनसह आर्ट गॅलरीची निर्मिती…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर , दि. १५ सप्टेंबर – देशातील आघाडीच्या ज्वेलरी ब्रँडपैकी असलेल्या पु. ना. गाडगीळ आणि सन्सने सोलापुरात भव्य दालन नव्या वास्तूत सुरू केले आहे. याच नव्या वास्तूचे उद्घाटन पी.एन.जी सन्सचे संस्थापक अजित गाडगीळ व डॉ. रेणू गाडगीळ यांच्या हस्ते झाले. यावेळी कंपनीचे संचालक- सीईओ अमित मोडक, रिजन हेड जितेंद्र जोशी, अडमिन हेड समीर परांजपे, सोलापूर शोरुमचे व्यवस्थापक हेमंत साई यांच्यासह अंजू गाडगीळ, रवी खाडीलकर, सतीश व श्रीकांत कुबेर, सुहास एकबोटे आदी उपस्थित होते.
सोलापुरात पीएनजी सन्सने एक दशकापूर्वी दालन सुरू केले, आणि पहिल्या दिवसापासून ग्राहाकांनी भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन पीएनजी सन्सने स्वतःची भव्य वास्तू सोलापुरातील डफरीन चौकात उभारली आहे. सोलापुरातील दागिन्यांचे हे सर्वांत मोठे दालन ठरणार असून, सोलापुराच्या वैभवात यामुळे भर पडणार आहे. दालनाच्या विस्ताराबाबत अजित गाडगीळ म्हणाले, की ग्राहक हा राजा असून, काळानुसार अपग्रेड होणे, ही गरज बनली आहे. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नवी प्रशस्त दोन मजली वास्तू उभारली असून, पंधरा हजार चौरस फुटांत दालनाचा विस्तार आहे. त्यामुळे ग्राहकांना निवांतपणे या ठिकाणी दागिन्यांची खरेदी करता येणार आहे. तसेच, पार्किंगची सोयही या ठिकाणी केली आहे. याचबरोबर सोलापूरकरांना कलेचा आस्वाद घेता यावा यासाठी येथे आर्ट गॅलरी सुरू केली आहे. पीएनजी सन्सची महाराष्ट्र, कर्नाटक व गुरजार मिळून तीन दालने आहेत. तसेच, गार्गी बाय पीएनजी अँड सन्स हा प्रीमियम फॅशन ज्वेलरीची देशातील पहिला शेअर बाराजारातील लिस्टेट ब्रँड आहे.
कंपनीचे सीईओ अमित मोडक म्हणाले, की ग्राहकांच्या बदलणाऱ्या गरजा लक्षात घेऊन हे दालन डिझाइन केले आहे. ग्राहकांना नवीन प्रकारच्या खरेदीचा अनुभव मिळावा, अशा पद्धतीने शोरूमची रचना आहे. ग्राहकांना डिझायनर ज्वेलरीबरोबर मास्टर पीसेस आणि क्यूरेटेड कलेक्शनच्या व्हरायटीतून आवडीचा दागिना निवडता येईल. हिऱ्याच्या दागिन्यांची सर्वोत्तम व सर्वांत मोठी व्हरायटी येथे उपलब्ध आहे. त्याचबरोबर गार्गी बाय पीएनजी अँड सन्सची नॅचरल डायमंडची १४ कॅरेट गोल्डमधील व चांदीची प्रीमियम फॅशन ज्वेलरी येथे उपलब्ध आहे.
या उद्घाटन प्रसंगी प्रिसिजनचे संचालक यतीन शहा, डॉ. सुवासिनी शहा, डॉ. किनीकर, मिलिंद एकबोटे, अविनाश महागावकर, जॉन फुलारी, श्रीदेवी फुलारी, डॉ. गौरी जोग, आधी सह शहरातील विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या उपस्थित मान्यवरांचे आणि पहिल्याच दिवशी खरेदीला गर्दी करणाऱ्या ग्राहकांचे सीईओ अमित मोडक यांनी आभार मानले.
खरेदीला ग्राहकांची गर्दी
पी. एन. गाडगीळ अँड सन्स या शोरूमचे काल सकाळी दहा वाजता उद्घाटन झाल्यानंतर अकरा वाजल्यापासून ते रात्री शोरूम बंद होईपर्यंत सोलापूरकरांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उद्घाटनच्या दिवशीच ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने पी. एन .गाडगीळ अँड सन्स च्या वतीने सोलापूरकरांचे आभार.
– अजित गाडगीळ , प्रवर्तक