अवयवदान जनजागृतीसाठी ; आयुर्वेद महाविद्यालयाचा पुढाकार…

अवयवदान जनजागृतीसाठी शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाचा पुढाकार…

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि २४ जुलै – शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व शारिर रचना विभागाच्या वतीने अवयवदान जनजागृती अभियानांतर्गत सोलापुरातील चार पुतळा चौक व शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय येथे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

       या पथनाट्यात बी एम एस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन अवयवदानाचे महत्त्व, अवयवदान कोण करू शकतो, कोणकोणते अवयव दान करता येतात, रुग्णास दृष्टी, जीवनदान कसे मिळू शकते आदींची माहिती या पथनाट्यातून सादर केली. तसेच अवयव दानाविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सैद्धांतिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकण्याचे काम या पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केले.

            दरम्यान या पथनाट्यात अनिशा जैन, साक्षी जैन, मित जैन, तिथी बाफना, आकांक्षा झळके, प्राची संचेती, क्रिशा जैन, ऐश्वर्या फडे, सागर सोनटक्के, सिद्धी महिद्रकर आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी नेत्ररोग तज्ञ डॉ. निरंजन शहा यांनी नेत्रदानाविषयीची कविता सादर केली. यावेळी उपस्थित नागरीकातील सुर्यकांत शेरखाने यांनी या अभियानचे कौतुक केले व व यातून नक्कीच प्रेरणा मिळाल्याचे मत मांडले.

      यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वीणा जावळे, उपप्राचार्य डॉ. शांतीनाथ बागेवाडी, प्रशासकीय अधिकारी श्री.अनुप दोशी, डॉ. रेवणसिद्ध उस्तुरगे, देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्थेचे दुमालकर, दधीची अवयवदान प्रचारक संघ, चळवळीचे कार्यकर्ते उदय आळंदकर, डॉ. अविनाश चव्हाण, डॉ. भोजराज चौधरी, डॉ. आनंद मादगुंडी, डॉ. स्मिता गोटीपामुल, डॉ. गायत्री देशपांडे, डॉ विद्यानंद कुंभोजकर, महावीर लाळे आदींची उपस्थिती होती. यावेळी नागरिक, विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *