सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ नाईट्या संतोष नलावडेची येरवड्यात रवानगी !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२ जुलै
सोलापूर शहरातील सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ नाईट्या संतोष नलावडे वय-२५ वर्षे, रा. सुंदराबाई डागा शाळेजवळ, बांध वस्ती, दमाणी नगर, सोलापूर याची अखेर येरवड्यात रवानगी करण्यात आली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या परिसरात सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ नाईटया संतोष नलावडे, हा मागील काही वर्षांपासुन सातत्याने जिवघेण्या घातक शस्त्राने इच्छापुर्वक दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोचवणे, विनयभंग करणे, जबरी चोरी, खंडणी मागणे, धाक दाखवणे, दगडफेक करणे, घातक शस्त्रांनी धमकवणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत.
ओंकार ऊर्फ नाईटया नलावडे यास त्याच्या गुन्हेगारी वृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही, ओंकार ऊर्फ नाईटया नलावडे, याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल असे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली. त्यामुळे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध घाण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी, दि.०१ जुलै रोजी नलावडे याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.