” नवीपेठेतल्या जुन्या पुस्तकांच्या बाजाराला आले पुन्हा एकदा सुगीचे दिवस “
” पाऊण किंमतीत पुस्तके घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी……!
सोलापूर व्हिजन
सोलापूर दिनांक २३ जून :- सोलापूर शहर जिल्ह्यातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांचे पुस्तकांविना शिक्षण थांबू नये, त्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू राहावे तसेच जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना अव्याहतपणे शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नव्यापेठेतील जुन्या पुस्तकांच्या बाजारात ग्राहकांची पुन्हा एकदा रेलचेल वाढलेली दिसत आहे. पूर्वी नवी पुस्तके घेण्याचे प्रमाण कमी होते जुन्या बाजारातच पुस्तके घेतली जात आणि विक्री केली जात असे पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय सुरू असायचा. शहरवासीय देखील या ठिकाणाहूनच पुस्तकांची खरेदी करत असत मात्र या बाजाराला काही काळासाठी उतरती कळा लागली होती. वाढत चाललेली स्पर्धा , ऑनलाइन शिक्षण तसेच कोरोणा या आशा आनेक कारणांमुळे या पुस्तकाच्या जुन्या बाजारात पुस्तकाच्या मागणीत घट झाली होती.
त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या असंख्य व्यवसाईकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. ऑनलाईन शिक्षण आणि मोफत पुस्तक योजनेमुळे जुन्या पुस्तकांचा बाजारावर विपरीत परिणाम पडला होता. मात्र यंदाच्या वर्षी नवीन पुस्तकांच्या दरामध्ये वाढ झाली आहे इयत्ता दहावीच्या पुस्तकांचा एक सट हा सुमारे साडेआठशे ते नऊशे रुपयापर्यंत विक्री केला जात आहे तोच सट जुन्या बाजारात साडेसहाशे रुपयापर्यंत विकला जातो आहे त्याचपद्धतीने बारावीच्या पुस्तकांचा नवा सट हा सुमारे तेराशे रुपयापर्यंत आहे तर जुन्या बाजारात आठशे रुपये पर्यंत विक्री केला जात आहे. ग्राहकांकडून घेताना ५० टक्के दराने विकत घेऊन त्यावर नीटनेटक्या पद्धतीने बाइंडिंग करून पुस्तकाचा सट ७५ टक्केने विक्री केला जात आहे. अशा पद्धतीने जुन्या बाजारात पुस्तकांचा दर गरजू आणि होतकरू तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परवडत असल्याने याठिकाणी पुस्तक खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा वाढत चाललेला दिसत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नव्या पुस्तकांचा दर वाढल्याने जुन्या पुस्तकांच्या बाजारात विविध पुस्तके घेण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांची खरेदीसाठी रेलचेल वाढली आहे. ग्राहकांना पाहिजे ती पुस्तेक अल्प दरात आम्ही उपलब्ध करून देतो.
( विक्रेते संतोष राजपूत )
नव्या आणि जुन्या पुस्तकांच्या दरात तफावत…..
दरम्यान नव्या आणि जुन्या पुस्तकांच्या दरात मोठी तफावत निर्माण झाल्याने ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी जुन्या बाजाराकडे वळालेला दिसत आहे. यामुळे जुन्या पुस्तकांच्या बाजाराला पूर्वीप्रमाणेच सुगीचे दिवस आल्याचे पहावयास मिळत आहे.