Notice | आकुडे यांचे बांधकामात दुर्लक्ष, उपसंचालकांनी दिली नोटीस अन नाकारला खुलासा

Notice
सोलापूर : प्रतिनिधी

आरण (ता. माढा) येथे उपकेंद्राचे बांधकाम सुरू आहे. येथे उपसंचालक स्तरावरील समितीने भेट दिली. यावेळी एचडब्ल्यूसी (HWC) उपकेंद्र बांधकामावर दुर्लक्ष असल्याचे या समितीला दिसून आले. परिणामी याला जबाबदार पासुविक (पायाभूत सुविधा विकास कक्ष) चे कनिष्ठ अभियंता नरसिंह आकुडे यांना पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. राधकिशन पवार यांनी Notice बजावली आहे.

Notice मध्ये म्हटले आहे की, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, उपसंचालक स्तरावरील समितीने कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. यामध्ये आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे बांधकाम दुरुस्ती पासुविक विभागामार्फत सुरु आहे. सदर बांधकामाबाबत खालील निरिक्षणे निदर्शनास आली.

Notice

उपसंचालक कार्यालयामधील बैठकीतील इतिवृत्तानुसार सर्व बाबींचा अनुपालन अहवाल सादर करणेबाबत आपल्याला समक्ष सूचना देण्यात आलेल्या होत्या. तसेच कार्यकारी अभियंता यांनी लेखी पत्र देऊनही आपण इतिवृत्तातील सर्व बाबींचे अनुपालन अहवाल या कार्यालयास उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांचेमार्फत सादर केलेला नाही.

कामाचा बारचार्ट, कामावर कनिष्ठ अभियंता यांच्या भेटीचे रजिस्टर नसल्याचे निदर्शनास आले. सदरचे बांधकाम सुरु झालेले नाही. कंत्राटदाराने फक्त बांधकाम साहित्य २ महिने झाले आणून ठेवलेले आहे. त्यामुळे एएनएम येथील वास्तवास राहून सेवा देत आहे. परंतु बांधकाम साहित्यामुळे एएनएमला कामकाजामध्ये अडचणी निर्माण होत आहे. तसेच रुग्णांची गैरसोय होत आहे. याला सर्वस्वी जबाबदार पायाभूत सुविधा विकास कक्ष सोलापूर आहे. अद्यापही आपल्यास्तरावरील सर्व कामे संथ गतीने सुरु आहे. यामध्ये काहीच प्रगती झाल्याची दिसून येत नाही.

बैठकीमध्ये सूचना देऊनही आपणामध्ये कोणतीच प्रगती दिसून येत नाही. यामुळे आपल्यावर प्रशासकीय कार्यवाही का करण्यात येऊ नये ? तसेच नमूद केलेल्या बाबींचा तातडीने पुढील २ दिवसाच्या आत खुलासा या कार्यालयास सादर करावा. सदरचा खुलासा पुढील २ दिवसात प्राप्त न झाल्यास आपल्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, अशी Notice पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. राधकिशन पवार यांनी दिली आहे.

Notice

सदरच्या Notice ला पासुविक चे कनिष्ठ अभियंता नरसिंह आकुडे यांनी खुलासा दिला आहे. परंतु खुलासा हा वस्तुनिष्ठ व समर्पक नसून आपण आपल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या योग्य रित्या पार पाडत नाही, हे यावरून स्पष्ट होत आहे आणि सदरचा खुलासा अमान्य करण्यात येत असल्याचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आकुडे यांच्यावर प्रशासकीय काय कारवाई होणार ? याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.

Notice
Notice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *