स्वच्छता,पाणीपुरवठा, रस्ता,वाहतूक, वीज,आरोग्य व शिक्षण अशा अन्य प्रमुख कामांना प्राधान्य द्या नूतन आयुक्तांकडून किसन जाधवांनी केली अपेक्षा

नूतन पालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे यांचा इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं सत्कार…

स्वच्छता,पाणीपुरवठा, रस्ता,वाहतूक, वीज,आरोग्य व शिक्षण अशा अन्य प्रमुख कामांना प्राधान्य द्या नूतन आयुक्तांकडून किसन जाधवांनी केली अपेक्षा…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२० फेब्रुवारी

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शितल तेली-उगले यांची बदली झाली असून नूतन पालिका आयुक्त म्हणून डॉ. सचिन ओंबासे यांनी गुरुवारी त्यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. याआधी नूतन पालिका आयुक्त हे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. दरम्यान इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी नवनिर्वाचित पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांचे स्वागत करीत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक,पेन, शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

            त्याचप्रमाणे मावळते आयुक्त शितल तेली-उगले यांचा देखील यावेळी किसन जाधव यांनी सत्कार केला. सध्या सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक असून आपण त्याचे प्रमुख आहात ही महत्त्वाची अत्यंत गरजेचे कामे आहेत, अशी स्वच्छता पाणीपुरवठा रस्ता वाहतूक वीज आरोग्य व शिक्षण या सह अन्य प्रमुख कामांना आपण प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा नवनिर्वाचित पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे किसन जाधव यांनी व्यक्त केली.सोलापूर शहराच्या विकासासाठी जी सध्या चालू आहेत आणि नव्याने काही कामे सुरू करायचे आहेत यावर आपण विशेष भर द्यावा.

सोलापूरकरांच्या अडीअडचणी वेळेत सोडवण्यासाठी देखील आपण प्रयत्नशील राहावे असेही यावेळी किसन जाधव यांनी नवनिर्वाचित पालिका आयुक्तांकडून अपेक्षा व्यक्त केली. यावर नूतन पालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे म्हणाले की, पॉझिटिव्ह कामे पुढे नेण्यासाठी तसेच सोलापूरकरांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक विभागाच्या प्रमुखांकडून माहिती घेऊन आपण काम करू नक्कीच सोलापूरकरांना दर्जेदार मूलभूत सुविधा प्राधान्य देऊ अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली. याप्रसंगी इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे सचिन आंगडीकर,वसंत कांबळे,महादेव राठोड, उमेश राठोड,जितेश भोसले आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *