लोकमान्य संयुक्त महामंडळाच्या वतीने कोणत्याही मंडळाला कोणतीही अडचण येऊ देणार नाही :- नूतन उत्सव अध्यक्ष डॉ किरण देशमुख

लोकमान्य संयुक्त गणेश उत्सव महामंडळाच्या गणेशोत्सवच्या अध्यक्षपदी डॉ. किरण विजयकुमार देशमुख यांची निवड…..

सोलापूर व्हिजन 

सोलापूर , दी. २५ ऑगस्ट – लोकमान्य संयुक्त गणेश उत्सव महामंडळाची बैठक पत्रा तालीम येथे संपन्न झाली. यावेळी याबैठकीला महामंडळाचे सल्लागार दत्तात्रय कोल्हारकर, दिलीप कोल्हे , श्रीकांत घाडगे , राजन जाधव सल्लागार मंडळाच्या उपस्थितीत सर्वप्रथम लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळ मागील इतिवृत्तांचाचे वाचन करून आर्थिक ताळेबंद जाहीर करण्यात आला. त्यानंतर नूतन उत्सव अध्यक्ष निवड कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्वानुमते उत्सव अध्यक्षपदी डॉ. किरण देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. तर दोन उपाध्यक्ष , खजिनदार,  कार्याध्यक्ष अशा विविध पदांची देखील निवड करण्यात आली…

नूतन पदाधिकाऱ्यांची निवड 

उपाध्यक्षपदी रणजीत चौगुले , सज्जन वडणे , सेक्रेटरी विनोद मोटे , मोहन मुन्ना , खजिनदारपदी दत्ता भोसले,  मिरवणूक प्रमुखपदी गिरीश शेगर , कार्याध्यक्ष आदित्य घाडगे , सहकार्याध्यक्षपदी आशिष शेळके,  प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन सोनवणे, यांची एकमताने निवड करण्यात आली.

              यावेळी उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना यंदाचा गणेशोत्सव  शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरा करावा  असे आवाहन जेष्ठ सल्लागार राजन जाधव , दिलीप कोल्हे यांनी केले. तद्नंतर नूतन उत्सव अध्यक्ष डॉ.किरण देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना यंदाचा  गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करू तसेच लोकमान्य संयुक्त महामंडळाच्या वतीने कोणत्याही मंडळाला कोणतीही अडचण येऊ देणार नाही असे आश्वासन दिले.

   यावेळी बापू धगेकर ,महादेव गवळी ,  बापू जाधव, लहू गायकवाड, नवनाथ बनने,बाळासाहेब गायकवाड, पिंटू चव्हाण, उमाकांत घाडगे, शेखर फंड, भैय्या बनसोडे राहुल बनसोडे, देवीदास घुले, ओंकार भुरले किरण पवार आदी आदींसह महामंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि गणेशभक्त उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *