उद्यापासून धावणार आणखीन ६ इलेक्ट्रिक बसेस
ध्वनीप्रदूषण व हवाप्रदूषण विरहित प्रवासाचा लाभ घ्यावा – विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांचे प्रवाशांना आवाहन
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२८ नोव्हेंबर
प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने प्रवाशांचा प्रवास अधिक लाभदायक व गतीने व्हावा, यासाठी अत्याधुनिक बसेसची निर्मिती करत आहेत. त्या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या वतीने इलेक्ट्रिक बसेस निर्माण करून प्रवाशांच्या सेवेसाठी त्या राज्यातील विविध मार्गावर सोडण्यात येत आहेत.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सोलापूर एसटी विभागाच्या ताफ्यात आता आणखीन नव्या ६ इलेक्ट्रिक बसेस दाखल झाले आहेत. आज शनिवार (दि.३०) नोव्हेंबर पासून सोलापूरकरांच्या सेवेत इलेक्ट्रिक बस सेवेत रुजू होत आहेत. यापूर्वीच्या १० आणि आता आलेल्या ६ अशा एकूण १६ इलेक्ट्रिक बसेस सोलापूर एसटी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. सद्या प्राप्त झालेल्या नव्या ६ बसेस सोलापूर ते लातूर या मार्गांवर धावतील. सदर बसेस घ्या सोलापूर- तुळजापूर -उजनी औसा- लातूर व परत याच मार्गावरून परत सोलापूरकडे नियमितपणे धावतील. सदरील बसेसची वेळ ही सकाळी ६.०० वाजल्यापासून सुरू होऊन सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहते. प्रत्येक अर्ध्या तासाला सोलापूर होऊन लातूरपर्यंत बस सेवा उपलब्ध राहील, सदची इलेक्ट्रिक बस ही संपूर्ण एसी असून, प्रवाशांना जलद, सुरक्षित व आरामदायी असा प्रवास करता येणार आहे.
ध्वनीप्रदूषण व हवाप्रदूषण विरहित प्रवासाचा लाभ घ्यावा
सोलापूर ते लातूर सकाळी ६.०० पासून सायंकाळी ५.३० पर्यंत एकूण १२ फेऱ्या लातूर ते सोलापूर सकाळी ९.०० पासून सायंकाळी ९.०० पर्यंत एकूण १२ फेऱ्या सदरील बसेस ह्या संपुर्ण इलेक्ट्रिक असतील, सदरील बसेस ह्या वातानुकूलित असतील, आरामदायी सीट्स असतील, सदरील बसेस मध्ये महिलांना ५० टक्के सवलत असेल, अमृतजेष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत असेल, जेष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत असेल तसेच ईतर सर्व सवलती असतील. सदरील बसेस ह्या ध्वनीप्रदूषण व हवाप्रदूषण विरहित असतील. तरी सर्व प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, अशी विनंती सोलापूर विभागामार्फत करण्यात येत आहे.
अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक सोलापूर एसटी विभाग