नूतन प्रशासक मोहन निंबाळकर यांनी स्वीकारला पदभार

सोलापूर बाजार समितीवर प्रशासकराज ; शेतकऱ्यांना सुविधा देण्यावर असणार भर ; नूतन प्रशासक मोहन निंबाळकर यांनी स्वीकारला पदभार….

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि २० जुलै – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत १४ जुलै रोजी संपल्यानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासनाने पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर निंबाळकर यांनी प्रशासक म्हणून पदाचा पदभार स्वीकारला आहे.

           यावेळी बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यापूर्वी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिव या पदावर मोहन निंबाळकर यांनी कार्य केले आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये कार्य करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

            दरम्यान या अनुभवाच्या जोरावर बाजार समितीमध्ये योग्य ते सुविधा आणि बदल घडवण्यासाठी सक्रिय राहणार आहेत. विशेषतः शेतकऱ्यांसाठी यापूर्वी देखील सुविधा उपलब्ध करून दिले आहेत आता देखील नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

प्रशासक म्हणून कामकाज करताना अडचणी येणार नाहीत

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणखीन बदल घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून यापूर्वी केलेल्या सकारात्मक कामाचा अनुभव यासाठी उपयोगी येणार आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये प्रशासक म्हणून कामकाज करताना कोणतीही अडचण येणार नाही. 

– मोहन निंबाळकर , पणन उपसंचालक तथा नवनिर्वाचित प्रशासक , सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *