राष्ट्रवादीने केला एकच जल्लोष …विधानपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादी आणि महायुतीचा दणदणीत विजय…
सोलापूर दि १३ जुलै – राज्यात नुकत्याच विधानपरिषदेच्या निवडणूका पार पडल्या यामध्ये महायुतीतील सर्व उमेदवार निवडून आले राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली होती हे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंती क्रमांकांच्या मतावर निवडून आले तसेच महायुतीतील उमेदवार निवडून आले त्याबद्दल राष्ट्रवादी ज्यांच्या विचारधारेवर चालतो ते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जल्लोष करण्यात आला “एकच वादा अजित दादा” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो “
“महायुतीचा विजय असो ” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
फटक्याची आतषबाजी करून पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. शिवाजीराव गरजे राजेश विटेकर यांचा विजय म्हणजेच आमदारांचा अजितदादांनवर असलेला विश्वास सिद्ध होतो. जे लोक म्हणत होते राष्ट्रवादीचे मत फुटणार त्यांच्या साठी ही मोठी चपराक आहे. “आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय असा टोमणा विरोधकांना घोषणे दरम्यान मारण्यात आला.
दरम्यान जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महायुतीतील सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन करतो शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचा विजय म्हणजेच आमदारांनी अजितदादा पवार यांच्यावर असलेला विश्वास सिद्ध होतो.विरोधातील नेते सांगत होते राष्ट्रवादीचे आमदार फुटणार परंतू या निवडणुकीत विरोधकांची मते फुटली आहेत असे मत व्यक्त केले.
दरम्यान कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी त्यांच्या मनोगतात महायुतीतील सर्व नुतन आमदारांचे हार्दिक अभिनंदन करतो ही निवडणूक महायुतीतील सर्व नेत्यांनी एकत्रित लढल्याने हे यश मिळाले असे मनोगत व्यक्त केले.तर महिला आघाडी शहराध्यक्ष संगीता जोगदनकर यांनी सर्व विजयी आमदार यांचे अभिनंदन करत अजितदादांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केल्याबद्दल सर्व महिलांकडून मी त्यांचे आभार मानते असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते प्रा.श्रीनिवास कोंडी बिजूअण्णा प्रधाने आनंद मुस्तारे सुरेश तोडकरी अँड.सलीम नदाफ, महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम युवक अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का दत्तात्रय बडगंची सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख कार्याध्यक्ष संजय मोरे ओबीसी अध्यक्ष अनिल छत्रबंध कार्याध्यक्ष बाबू पटेल शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे व्ही जी एन टी अध्यक्ष रुपेश भोसले, कामगार सेल अध्यक्ष संजीव सांगळे वैद्यकीय कक्ष अध्यक्ष बसवराज कोळी वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष,अनिल बनसोडे सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर सोशल मिडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे सुजित उघडे शामराव गांगर्डे विनय रायकर दक्षिण विधानसभा महिला अध्यक्ष प्रिया पवार,कार्याध्यक्ष कांचन पवार सुरेखा घाडगे महेश कुलकर्णी प्रज्ञासागर गायकवाड,प्रकाश शिंदे कुमार झगडेकर,दशरथ शेंडगे याकूब नवगिरे शांतराज जंगम डेविड कुराडे जॉन दिनकर मनोज काशीद आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते ..