बालेवाडी येथे होणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राज्यव्यापी मेळावा !
सोलापुरातून हजारो कार्यकर्ते होणार रवाना – शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांची माहिती
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.७ जून
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन मंगळावर (दि.१०) जून रोजी आहे. पुणे बालेवाडी स्टेडियम येथे भव्य मेळाव्याच्या स्वरूपात वर्धापन दिन साजरा होणार आहे. या मेळाव्यास सोलापूर शहर व जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते पुणे येथे रवाना होणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी दिली.
दरम्यान, या भव्य मेळाव्यास राज्यभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार,राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, छगन भुजबळ,हसन मुश्रीफ तसेच राष्ट्रवादीचे मंत्री मंडळातील मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना लाभणार आहे.
सध्या शहर जिल्हास्तरावर या मेळाव्याची पूर्व तयारी सुरू असून राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग घेऊन सर्व जिल्हाध्यक्षांना नियोजनाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसार सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बालेवाडी येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या भव्य मेळाव्यास सोलापूर शहरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याकरिता सोलापूर शहरातील सर्व ज्येष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी, सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष , कार्याध्यक्ष ,विधानसभा अध्यक्ष व शहर पदाधिकारी आणि शहर कार्यकारणी यांनी हजारोंच्या संख्येने राज्यव्यापी मेळाव्यास कार्यकर्ते घेऊन जाण्यासाठी तयारीला लागावे असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केले आहे.
यावेळी व्यासपीठावर प्रदेश जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान सरचिटणीस फारुक मटके,कुमार जंगडेकर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले जेष्ठ नेते बाबाभाई सालार सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम युवती अध्यक्ष किरण माशाळकर अल्पसंख्यांक अध्यक्ष आमिर शेख शहर उपाध्यक्ष शकील आदींची उपस्थिती होती.