फक्त एक कॉल प्रॉब्लेम सॉल – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या निवेदनाची अजित पवारांनी घेतली दखल…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या निवेदनाची अजित पवारांनी घेतली दखल…

महिला व विद्यार्थिनींच्या तक्रार निवारणसाठी बारामतीत शक्ती बॉक्स तक्रार पेटीची घोषणा…..

फक्त एक कॉल प्रॉब्लेम सॉल – अजित पवार…!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दी.०३ ऑक्टोंबर – राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे . शाळा महाविद्यालयांमध्ये प्रामुख्याने असे प्रकार सर्रास घडत होते. नराधमांनी अल्पवयीन पीडीतेचा वयाचा विचार न करता लैंगिक अत्याचार करण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने समाज व्यवस्थेत बाब आणण्याचे काम हे नराधम समाजकंटक करत आहेत हे प्रमाण तात्काळ रोखण्यासाठी शहर व ग्रामीण स्तरावर विविध शाळा महाविद्यालयांमध्ये मुलींच्या स्वसंरक्षणासाठी पूर्व प्रशिक्षित कराटे क्लासेस चालू करावेत या मागणीचे निवेदन महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे व राज्याचे विकासरत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांनी केली होती.

  दरम्यान याची दखल घेऊन अजित पवार यांनी बुधवारी बारामतीत शक्ती बॉक्स तक्रारपेटी संकल्पना याची घोषणा करत अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू करण्यात आली असून राज्यातील महिला भगिनी मुलींनी आपली तक्रार या शक्ती बॉक्स तक्रार पेटी द्यावी नक्कीच शक्ती बॉक्स तक्रार पेटीत असलेल्या तक्रारींची दखल घेऊन तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांच्या निवेदनाची अजित पवारांनी तात्काळ दखल घेतल्याने राज्यातील महिला भगिनी व मुलींनी या  निर्णयाचे व वैभव गंगणे यांच्या पाठपुराव्याचे स्वागत केले व आभार प्रकट केले…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *