सुधीर खरटमल यांची मनधरणी करणार…
आमच्यामध्ये कोणताही मतभेद मनभेद नाही – प्रवक्ते यु.एन.बेरिया….
प्रतिनिधी सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २ सप्टेंबर – आमच्यामध्ये कोणतेही मतभेद किंवा मनभेद नाहीत, पक्षांमध्ये कोणताही अंतर्गत कलह नाही, सुधीर खराटमल यांनी त्यांच्या वैयक्तिक कामामुळे सदरचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. आम्ही त्यांची मनधरणी करणार आहोत तसेच वरिष्ठ पातळीवर देण्यात आलेला अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यास सांगणार आहोत असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट प्रवक्ते यु एन बेरिया यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे..
पुढे ते म्हणाले, आमच्या पक्षामध्ये विनाकारण दुफळी माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले मजकूर चुकीचे आहे. त्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही, त्याच बातमीचा खुलासा या माध्यमातून करत आहोत. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर देखील यासंबंधी कळवण्यात आले आहे. सुधीर खरटमल यांचा राजीनामा नामंजूर करण्यास वरिष्ठ पातळीवर विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे सुधीर खरटमल यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात येईल असा विश्वास आम्हाला वाटतो आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाकडून नवीन नमुना अर्ज पाठवण्यात आला आहे. पक्षातील इच्छुक उमेदवारांनी सदरचा अर्ज पक्ष कार्यालयात भरून द्यावयाचा आहे. त्याबाबत बैठक पार पाडली. परंतु या बैठकीत या घटनेची चर्चा झाली नाही. असेही, ते यावेळी म्हणाले.
पक्षात काहीही झाले तरी महेश कोठेचे नाव…
पक्षांमध्ये कोणतीही घटना घडली, तर माझे नाव नक्कीच येते. वास्तविक पाहता या घटनेमध्ये मला कोणत्याही प्रकारची माहिती नाही. जरी सुधीर खराटमल यांनी माझ्या नावाने पत्र लिहिले असले, तरी देखील याबाबत माझी त्यांची कोणतीही चर्चा झाली नाही.
– महेश कोठे, माजी महापौर.
यापत्रकार परिषदेस प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, भारत जाधव, माजी महापौर मनोहर सपाटे, महेश कोठे, तौफिक शेख, युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर, दिनेश शिंदे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.