राष्ट्रवादी ने फोडला बजेटचा भोपळा ; केंद्र सरकारचा व्यक्त केला जोरदार निषेध

केंद्रीय अर्थसंकल्पाचा शरद पवार गटाने फोडला भोपळा …

महाराष्ट्र राज्याला डावलल्याचा व्यक्त केला रोष..!

सोलापूर व्हिजन 

सोलापूर २४ जुलै – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. सदरच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याला भरीव असा निधी उपलब्ध केला नाही. झोपते माप बिहार राज्याला देण्यात आले. याचा निषेध करण्यासाठी शरद पवार गटाच्यावतीने चार हुतात्मा चौक या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले.

         केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा यावेळी जोरदार निषेध करून भोपळा फोडून निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दुय्यम स्थान दिले असून म्हणावा तसा ठोस निधी उपलब्ध करून दिला नाही. बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्याला अर्थसंकल्पामध्ये झुकते माप देऊन महाराष्ट्र राज्याला डावलले. असा आरोप यावेळी करून केंद्रीय अर्थसंकल्पाचा फुगीर भोपळा फोडण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल , प्रवक्ते यु एन बेरिया , माजी महापौर जनार्दन कारमपुरी , प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड , जेष्ठ नेते महेश गादेकर , दिनेश शिंदे , युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर , चंद्रकांत पवार , सरफराज शेख , महिला अध्यक्षा सुनीता रोटे , युवती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण , अजित बनसोडे, सरफराज शेख, निशांत साळवे, अजित पात्रे, मुसा आत्तार, दिवाकर संपन्न, वंदना भिसे, सिया मुलानी, प्रतीक्षा चव्हाण, मनीषा माने, अक्षय जाधव, लक्ष्मण भोसले, जावेद खरेदी, अमित मोतीवार, सोपान खांडेकर, श्रीकांत शेरखाने, शक्ती कटकधोड, सुनील इंगळे, रियाज मोमीन, वि डी गायकवाड, फयात सय्यद, लता फुटाणे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र रोष महाराष्ट्र रोष महाराष्ट्राला भोपळा आणि मित्र पक्षांना सापळा, अर्थसंकल्पामध्ये एकच उद्देश बिहार आणि आंध्र प्रदेश , मिलीजुली सरकारचा खुर्ची वाचवण्यासाठी मिलाजुला बजेट अशा विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला.

महाराष्ट्र राज्याने केंद्राला सर्वाधिक कर स्वरूपात पैसे उपलब्ध करून दिले. परंतु त्याच महाराष्ट्र राज्याला दुय्यम वागणूक दिली जाते. शेतकऱ्यांना सवलत देणे गरजेचे असताना दिले गेले नाही. रेल्वेचे अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून हलवले गेले. युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही. राज्यातील तिघाडी सरकारला निधीचा गाजर दाखवला गेला परंतु ठोस निधी आणि प्रकल्प उपलब्ध करून दिला गेला नाही त्यामुळे या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध व्यक्त करत आहे. 

– सुधीर खरटमल, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने लोकसभेत सर्वाधिक खासदार निवडून आणले. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राने दुय्यम स्थान दिले. वास्तविक पाहता विदर्भामध्ये हे ठोस निधीची गरज असताना त्या ठिकाणी निधी दिला गेला नाही.

शेतकऱ्यांसाठी विविध खते बियाणे आणि औषधे यावर लावलेल्या जीएसटी कर काढणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही. युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार असे सांगितले परंतु बजेटमध्ये कोणतीही तरतूद केली गेली नाही. गरजू नागरिकांना आर्थिक तरतुदीची सवलतीची गरज होती परंतु सवलत दिली गेली नाही त्यामुळे या अर्थसंकल्पाचा आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध. 

ऍड यू.एन. बेरीया , प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *