निवडणूक विधान परिषदेची जल्लोष किसन जाधवांचा..
राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांची विधानपरिषदेवर निवड ; किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर एकच जल्लोष
सोलापूर व्हिजन
सोलापूर दिनांक १३ जुलै – विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४२ आमदारांचे संख्याबळ होतं उमेदवारांना विजयी होण्यासाठी २३ मतांचा कोटा होता महायुतीचे मत मिळून अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांनी हा कोटा सहज पूर्ण केला आणि महायुतीच्या मतांची फाटा फूट टाळली, शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे आता विधान परिषदेत आमदार म्हणून विराजमान झाले आहेत. त्यानिमित्ताने शुक्रवारी सायंकाळी रेल्वे लाइन्स येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांचा संपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटून कार्यकर्त्यांसह मोठा जल्लोष करण्यात आला.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाले तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गर्जे आणि विटेकर यांची विधान परिषदेवर निवड झाल्या निमित्त कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील अजित पवार गटाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील यामध्ये तिळमात्र शंका नाही या विजयाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे आगामी काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हे प्रगतीपथावर विकासाच्या दृष्टीने राहील अशी आशा देखील यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं.
राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेत राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोन्ही उमेदवार तसेच सर्व महायुतीचे उमेदवार निवडून आल्याबद्दल त्यांचे देखील आम्ही जल्लोष केल्याचे देखील यावेळी किसन जाधव म्हणाले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख,राष्ट्रवादी महिला समन्वयक शशिकला कस्पटे, जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव, शोभा गायकवाड महिला शहर उपाध्यक्ष ,शहर उपाध्यक्ष सुनिता बिराजदार, सरचिटणीस संगीता गायकवाड, सहसचिव अंजली आठवले, शहर उपाध्यक्ष प्रमिला स्वामी, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, शहर राष्ट्रवादी सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल बशीर शेख, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष रियाज शेख, अल्पसंख्यांक समन्वयक संजु मोरे, राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, दशरथ शेंडगे देशमुख, शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, शहर सचिव अमोल जगताप शहर संघटक माणिक कांबळे, हुलगप्पा शासम, कौशेन कुरेशी,माऊली जरग, ऋषी येवले, दिनेश आवटे, आकाश जाधव, जितेंद्र दारलू आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा जल्लोष करण्यात आला.