राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची निदर्शने ; अमित शहा यांच्या वक्तव्याचा केला निषेध !
शहा यांना दिली एका प्राण्यांची…. उपमा
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२३ डिसेंबर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचे परिणाम सोलापूर शहरात दिसत आहेत. शहा यांच्या वक्तव्याचे निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, मनोहर सपाटे, प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव, प्रवक्ते ऍड.यू.एन.बेरीया, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, सरचिटणीस चंद्रकांत पवार, युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, सरफराज शेख, माजी नगरसेविका पूनम बनसोडे, अजित बनसोडे, लता ढेरे, शेखर शेरखाने, आदींची उपस्थिती होती.
यावेळी शहर अध्यक्ष खरटमल म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागावी, आमचा खरा देव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. कारण हा देशच त्यांच्या संविधानावर चालतो हे अमित शहा यांनी लक्षात घ्यावे असे सांगितले.
प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड म्हणाले, अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहात, तुमची वागणूक म्हणजे एका गटरीतील प्राण्यासारखी आहे, म्हणूनच आम्ही तुमच्या चेहऱ्याला त्या प्राण्याचे स्वरूप देऊन तुमचा निषेध नोंदवत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.