दादांच्या राष्ट्रवादी भवनात इच्छुकांची उसळली भाऊगर्दी !

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी भवनात इच्छुकांची उसळली गर्दी !

 माजी महापौर, माजी उपमहापौर तसेच ५ माजी नगरसेवकांसह १२२ इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज  

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१६ डिसेंबर

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात झाली.पहिल्याच दिवशी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात आजी माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांची एकच गर्दी झाली होती. यामध्ये माजी महापौर, माजी उपमहापौर तसेच ५ माजी नगरसेवकांसह १२२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले.

काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते व माजी महापौर मकबूल मोहोळकर यांनी प्रभाग क्रमांक १४ साठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे यांनी प्रभाग क्रमांक १२ साठी उमेदवारी अर्ज घेतला. तर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रभाग क्रमांक २२, माजी ज्येष्ठ नगरसेवक तौफिक शेख यांनी प्रभाग २०, सिद्धेश्वर आनंदकर यांनी प्रभाग १ साठी तसेच माजी नगरसेविका नूतन गायकवाड यांनी प्रभाग १७, तसेच तस्लीम शेख यांनी प्रभाग क्रमांक २० साठी,राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीता जोगदनकर यांनी प्रभाग २६ साठी तसेच माजी नगरसेवक तौफिक शेख यांचे चिरंजीव अदनान शेख यांनी प्रभाग क्रमांक १६ साठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांनी अर्ज घेतल्यानंतर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्याकडे अर्ज सुपूर्द केले आहेत.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रा. श्रीनिवास कोंडी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले तसेच महिला शराध्यक्षा संगीता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम यांच्यासह माजी महापौर मकबूल मोहोळकर, माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे,बसवराज बगले ,माजी नगरसेवक तौफिक शेख आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी भवनात इच्छुकांची लगबग

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अबकी बार ७५ पार चा नारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण १०२ जागेवर उमेदवार उभे करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांची अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. यामध्ये पुरुषांबरोबर इच्छुक असणाऱ्या महिलांचाही मोठा समावेश दिसून आला. युवकवर्गांनी सुद्धा इच्छुक उमेदवारीसाठी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. यासाठी राष्ट्रवादी भवन सज्ज ठेवण्यात आले होते.

 

जंगी स्वागत आणि रेड कार्पेट 

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी उमेदवारीसाठी येणाऱ्या इच्छुकांसाठी राष्ट्रवादी भवनाच्या पायऱ्यांवर रेड कार्पेट टाकले होते. तर स्वागतासाठी ढोल आणि ताशा सज्ज ठेवला होता. वाजत गाजत सर्व इच्छुकांचे राष्ट्रवादी भवनात आगमन करण्यात आले. यावेळी इच्छुक उमेदवारांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे तसेच उत्साहाचे वातावरण दिसून आले.

सक्षम उमेदवार मैदानात

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सोलापूरचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे तसेच सहसंपर्क प्रमुख व विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांचे संपूर्ण मार्गदर्शन व ताकद मिळणार असून पक्षाकडून “आपकी बार ७५ पार” हा आक्रमक नारा देण्यात आला आहे. “सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्षम, स्वच्छ प्रतिमेचे व जनतेशी जोडलेले उमेदवार मैदानात उतरवत आहे, आगामी निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने सज्ज आहोत.

– संतोष पवार शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *