अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून ४२७ इच्छुकांच्या मुलाखती : तृतीयपंथीय अबोली मंजेली मुलाखत ठरली चर्चेचा विषय

सोलापूर महापालिकेसाठी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून ४२७ इच्छुकांच्या मुलाखती :

इच्छुकांच्या मुलाखती घेताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी

 

प्राध्यापक,डॉक्टर, वकील,अभियंता, उद्योजक, उच्च विद्याविभूषित युवक युवतींचा मोठा सहभाग

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२३ डिसेंबर 

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ४६५ इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. मंगळवारी यातील ४२७ जणांनी राष्ट्रवादी भवनात दिवसभरात मुलाखती दिल्या. त्यामध्ये प्राध्यापक,शिक्षक,डॉक्टर, वकील,अभियंता, उद्योजक, उच्च विद्याविभूषित युवक युवतींचा मोठा समावेश होता.

माजी महापौर आणि माजी नगरसेवक यांनी राष्ट्रवादी भवनात मुलाखतीसाठी लावलेली हजेरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

प्रभागाची सामाजिक समीकरणे, राजकीय पार्श्वभूमी, सामाजिक कार्य, प्रवर्गानुसार कास्ट सर्टिफिकेट, निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे आदी प्रश्न इच्छुक उमेदवारांना विचारण्यात आले. सोलापूरच्या विकासासाठी झपाटलेल्या उच्चविद्याविभूषित युवक युवतींनी मात्र जोशपूर्ण आणि दमदार मुलाखती दिल्या. सोलापूर शहराची बकाल अवस्था पाहता रस्ते, वीज आणि पाणी या सार्वजनिक मूलभूत सुविधा कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून सोलापूर महापालिकेत जाण्यासाठी इच्छुक असल्याचे अनेकांनी सांगितले. सोलापूर शहरातील विडी घरकुल परिसराच्या विकासासाठी तृतीयपंथीय अबोली मंजेली या इच्छुक उमेदवारांनी दिलेली राष्ट्रवादी भवनातील मुलाखत सर्वाच्या चर्चेचा विषय होती.

 

यावेळी राष्ट्रवादीचे शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, सेवादलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत दायमा, ज्येष्ठ नेते तौफिक शेख, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे, मागासवर्गीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत कांबळे, अल्पसंख्यांक नेते वसीम बुऱ्हाण,ज्येष्ठ नागरिक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत चौधरी,महिला कार्याध्यक्षा चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम आदींनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्रातील विकास कामांची धडपड आणि व्हिजन सर्वश्रुत आहे. त्यामुळे अजितदादांचे विकास कामाचे व्हिजन सोलापूरकर इच्छुकांनी मनावर घेतल्याचे मंगळवारच्या मुलाखतीवरून दिसून आले आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेच्या जवळपास असेल यात तिळमात्र शंका नाही. इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानंतर व सोलापूरचे संपर्कमंत्री दत्तात्रय मामा भरणे व सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांच्याशी चर्चा करून उमेदवार जाहीर करणार आहोत.

संतोष पवार, शहर – जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *