अजित पवारांच्या राष्ट्रवादीने इच्छुकांच्या अर्जांची सुरू केली स्वीकृती ; धरला स्वबळाचा नारा
शुक्रवारी इच्छुकांच्या उपसभापती अण्णा बनसोडे घेणार मुलाखती
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि १७ डिसेंबर
महापालिका निवडणुकीत महायुतीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही घटक पक्ष सकारात्मक आहेत. मात्र, गतवेळी स्वबळावर सत्तेवर आलेल्या भाजपची यावेळीही एकूण रणनीती पाहता महायुतीची शक्यता धुसर आहे. त्यामुळे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. पहिल्या दिवशी एकूण १२२ अर्जांची स्वीकृती पक्ष कार्यालयात करण्यात आली. आज बुधवारी अर्ज भरण्यासाठीचा दुसरा दिवस झाला. तर शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी अर्ज स्वीकृतीनंतर इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी उपसभापती अण्णा बनसोडे सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकीत अपवाद गळता स्वबळावर लढलेले भाजप हापालिका निवडणुकीतही शेवटपर्यंत मत्रपक्षांना झुलवत ठेवण्याची रणनीती भाजपची असल्याचेच दिसून येते. पक्षाची वाढलेली ताकद, निवडणुकीच्या व्याव तोंडावर झालेले घाऊक इनकमिंग, त्यामुळे निवडणूक लढविण्यास ८०० हे,” हून अधिक असलेली इच्छुकांची संख्या व भाजपकडून टाकली जात असलेली पावले व एकूण हालचाली पाहता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत बऊन मैदानात उतरण्याची शक्यता दसत नाही. याउलट अधिक इच्छुकांमुळे भाजपला बंडखोरीच्या आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. त्या पार्श्वभूमीवर मेदवारी जाहीर होण्याआधीच च्छुकांचे ‘प्रबोधन’ सुरू केले आाहे.
यामुळे मित्रपक्षांना दूर ठेवण्याची चिन्हे
भाजपने गतवेळी स्वबळावर ४९ जागा जिंकत महापालिकेची सत्ता काबीज केली. स्वतंत्र लढलेल्या एकत्र शिवसेनेला २१ जागा मिळाल्या होत्या, तर एकत्र राष्ट्रवादीला केवळ चार जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेच्या जागांत स्व. महेश कोठे यांच्या ताकदीचा ५५ टक्क्यांहून अधिक वाटा होता. ऐनवेळी युती फिस्कटल्याने काही ठिकाणी कोठे यांच्याशी तडजोडीही झाल्या होत्या. यावेळी भाजप तेथे ताकदीने उतरण्याच्या तयारीत आहे. यामुळे भाजप मित्रपक्षांना जवळ करण्याची शक्यता दिसत नाही.
युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील.
महायुतीबाबत चर्चेसाठी भाजपकडून कोणतेही निमंत्रण नाही. प्रत्येक पक्ष आपापला विस्तार करण्याचा प्रयत्न करेल. प्रदेशाने सर्व जागा लढवून ७५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसारच पक्षाची रणनीती आहे. मात्र, युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील.
संतोष पवार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
महायुतीबाबत निर्णयाचे अधिकार स्थानिक आमदारांना दिले आहेत. शहरात तीनही आमदारांनी ताकदीने मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. त्यावरून तिघेही आमदार युतीबाबत उत्सुक नसल्याचेच चित्र आहे. तर यावेळी ‘७५ पार’ साठी पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरही नियोजन केले गेले आहे. अद्याप भाजपकडून शिवसेना, राष्ट्रवादीला महायुतीबाबत चर्चेचे निमंत्रण नाही.
भाजपची स्वबळाची तयारी पाहता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसनेही सर्व १०२ जागी स्वबळावर उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, प्रदेश पातळीवर याबाबत निर्णय होईल, अशी शिवसेनेला अपेक्षा आहे. तर राष्ट्रवादीने आक्रमक धोरण स्वीकारले असले तरी त्यांचीही रणनीती प्रदेश पातळीवर ठरणार आहे. त्यासाठी सोलापूरचे सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे हे सोलापूर दौऱ्यावर येणार सांगण्यात येत आहे. शुक्रवारी अर्ज स्वीकृतीचा शेवटचा दिवस असून इच्छुकांच्या मुलाखती घेतील त्यानंतर युतीवर अंतिम निर्णय होईल असेही यावे सांगण्यात येत आहे.