ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरेंचे स्वागत
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१८ एप्रिल
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते तथा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे गुरुवारी खाजगी दौऱ्यानिमित्त सोलापुरात आले होते.
दरम्यान, अक्कलकोट- मैंदर्गी रोडवरील हेलिपॅड लँडिंग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील बाप माणूस पुस्तक, लेखणी, निळी शाल पांघरून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच माजी आमदार अनिकेत सुनील तटकरे यांचा स्वागत करीत त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस अमोल जगताप, शहर संघटक माणिक कांबळे, वसंत कांबळे, दिनेश आवटी, महादेव राठोड आदिसह ईच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी व सदस्य आदींचे उपस्थिती होती.