राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पहलगाम हल्ल्याचा जाहीर निषेध व मृतांना श्रद्धांजली!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२४ एप्रिल
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सोलापूर शहर राष्ट्रवादी पक्षाकडून सोलापूर शहरातील चार हुतात्मा पुतळ्यासमोर मुक आंदोलन करत दंडाला काळ्या फिती लावून जाहीर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी भारत माता की जय , वंदे मातरम् , धिक्कार असो धिक्कार भ्याड हल्ल्याचा धिक्कार असो अश्या घोषणांनी चार हुतात्मा चौक परिसर दणाणून सोडला. या दहशतवादी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात जे निष्पाप नागरीक मृत्यूमुखी पडले त्या निष्पाप शहीद झालेल्या नागरिकांना कँडल लावून दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
भारतीय सैन्य दलाने या हल्ल्यातील दहशतवादी अतेरेकी हल्लेखोरांचे तळाचे पायेमुळे शोधून काढून गोळ्या घालून ठार करावे अशी मागणी करीत राष्ट्राची सुरक्षा ही सर्वप्रथम आहे. याकरीता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव एकजुटीने सोबत आहे अशी भावना जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केली .
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर युवक अध्यक्ष सुहास कदम महीला कार्याध्यक्ष चित्रा कदम, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव,विशाल बंगाळे , खलिल शेख साजिद पटेल महेश कुलकर्णी, आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.