राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष पवारांनी घेतली कुलगुरूंची भेट ; या विषयांवर झाली साधक बाधक चर्चा….

उच्चशिक्षणासाठी मुलींना व्हावी फी माफी……

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केली कुलगुरूंशी सकारात्मक चर्चा……

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि २० ऑगस्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींकरिता फी माफीची घोषणा केली आणि तात्काळ शासन निर्णय जाहीर केला असून  त्याच शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महानवर यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी विद्यापीठात भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली.

 

        दरम्यान राज्य शासनाने घेतलेल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींकरिता फी माफीचा जो निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात अनेक कॉलेज या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना दिसत नाहीत अनेक मुलींच्या तक्रारी येत असून या संदर्भात विद्यार्थी व पालकांमध्ये या योजनेची संपूर्ण माहिती नसल्याकारणाने पालकांची व विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. तरी विद्यापीठाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता प्रभावी उपाययोजना करावी सर्वांना योजनांची लाभ आणि माहिती होण्याकरता ज्या पद्धतीने उच्च शिक्षण मंत्रालयाने टोल फ्री क्रमांक तक्रारीकरिता उपलब्ध केला आहे.

शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी…

 सोलापूर विद्यापीठाने देखील तशा पद्धतीची टोल फ्री क्रमांक जाहीर करून संबंधित जिल्ह्यातील मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या तक्रारी नोंदवून संबंधित शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या कॉलेजवर कारवाई करावी. त्यावर कुलगुरूंनी शासन निर्णयामध्ये अजून स्पष्टता येण आवश्यक आहे येणाऱ्या काळामध्ये सुलभता यावी योजनेचा फायदा सर्व सामान्य मुला- मुलींना व्हावा याकरता विद्यापीठाने शासनाकडे पत्र पाठवले आहे.

– संतोष पवार , जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर.

  याप्रसंगी कुलगुरूंचे भरजरी फेटा शाल पुष्पगुच्छ देऊन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा देऊन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सन्मान केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, वरिष्ठ अधिकारी अनंत पवार, सोमनाथ सोनकांबळे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, फर्नांडिस सर, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, सोशल मीडिया विभाग शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे , कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *