दौरा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा तर संघटन कौशल्याचे चातुर्य संतोष पवार यांचे : पक्षांतर्गत चर्चेला उधाण 

दौरा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा तर संघटन कौशल्याचे चातुर्य संतोष पवार यांचे : चर्चेला उधाण 

स्वकीयसह ईतर पक्षातील अनेक नेत्यांना अजित पवार यांच्या झेंड्याखाली आणले एकत्र 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२७ नोव्हेंबर 

सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. या बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावल्यानंतर अजित पवारांच्या शिलेदारांनी पुन्हा एकदा खिंड लढवून राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इतर पक्षातील नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेत आणले. त्याच कुशलतेने शहरातील आपल्याच पक्षाच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्र आणण्यात यश मिळवले आहे. यापूर्वी राष्ट्रवादीत गटाचे राजकारण केले जात होते. मात्र संतोष पवार यांनी हे खोडून काढत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षीय संघटन कौशल्याचे चातुर्य दाखवून दिले आहे. त्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला दिसत आहे. अण्णा बनसोडे यांच्या दौऱ्यानंतर शहरातील वातावरण बदलेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

अबकी बार ७५ पार चा नारा 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षीय संघटन कौशल्य पणाला लावून विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असून त्या अनुषंगाने अबकी बार ७५ चा नारा देण्यात आला आहे. दरम्यान, अण्णा बनसोडे यांच्या तीन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यात अनेक राजकीय कार्यक्रम, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, इच्छुकांशी संवाद, असे अनेक कार्यक्रम संपन्न होणार असून, यामुळे पक्षाच्या जडण घडणीला वेग येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अण्णा बनसोडे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *