राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदी आनंद चंदनशिवे यांच्या नियुक्तीने पक्ष विस्तारास अधिकची गती मिळेल – जिल्हाध्यक्ष संतोष पवार…
कार्यसम्राट आनंददादांचा जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी भवन कार्यालयात केला विशेष सत्कार !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ५ ऑक्टोंबर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आनंद चंदनशिवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली.
या निवडीबद्दल शनिवारी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात पक्षाच्या वतीने नूतन प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष पवार,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,जेष्ठ नेते हेमंत चौधरी,माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे ,अनिल उकरंडे,सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव,महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर , युवक अध्यक्ष सुहास कदम ,माजी नगरसेवक गणेश पुजारी, अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्ष अमीर शेख,शहर सचिव चंद्रकांत सोनवणे, प्रज्ञासागर गायकवाड, महिला आघाडी समन्वयक शशिकला कस्पटे,दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार, शोभा गायकवाड आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आनंद चंदनशिवे यांच्या कार्याची दखल घेऊन प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. या निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून सर्व पक्षातील सहकारी पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करीत येणाऱ्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आणखी वाढण्यासाठी ही निवड महत्वाची ठरेल. आनंद चंदनशिवे यांच्या निवडीने राष्ट्रवादीचा प्रचार आणि विस्तार करण्यासाठी अधिकची गती मिळेल अशी आशा व्यक्त केली.
दरम्यान सत्कारमूर्ती नूतन प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अजित पवार यांनी आपल्यावर जो विश्वास ठेवून प्रदेशवर काम करण्याची संधी दिली. त्या संधीचे नक्कीच राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करू राज्यात पक्षाची ताकद आणखीन मजबूत कशी होईल यासाठी प्रयत्नशील राहू अशी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी तर आभार वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख यांनी केले.