छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काळे फित बांधून केले मूक निषेध आंदोलन

राजकोट येथील घटनेत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी…..

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काळे फित बांधून केले मूक निषेध आंदोलन…..

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि. २९ ऑगस्ट – अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट सिंधुदुर्ग येथील पुतळा निकृष्ट दर्जाचे काम आणि हलगर्जीपणामुळे कोसळला. या प्रकरणात संबंधित दोषी अधिकारी, इंजिनीयर आणि मूर्तिकार या सर्वांचीच सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने मागणी करण्यात आली.

    

           राजकोट मधील घटनेचा निषेध करण्यासाठी मूक निषेध आंदोलन करण्यात आलं. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर काळ्याफिती बांधून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला . याप्रसंगी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष केला त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी स्तब्ध बसून मुक आंदोलन केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपली प्रतिक्रया व्यक्त करताना या घटनेमध्ये जे कोण दोषी असेल ते सर्व अधिकारी, मूर्तिकार, अभियंते असतील त्या सर्वांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना शासन झालं पाहिजे जेणेकरून पुढील काळात महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा बाबत उभारण्याचे काम करत असताना हलगर्जीपणा करणार नाहीत असे सांगितले.

    यावेळी कार्याध्यक्ष जुबेर बागवान म्हणाले, घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करून छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका पक्षाचे नसून सबंध भारतीयांचे आहेत, त्यामुळे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत घडलेला प्रकारात जो कोण दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी विरोधकांनी यामध्ये राजकारण न करता यामध्ये जे दोषी असतील त्यांना शासन करण्यामध्ये लक्ष घालावे.

  

  याप्रसंगी ज्येष्ठ नेते बिजू प्रधाने, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, सुभाष डांगे, सुरेश तोडकरी, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, महिला आघाडी दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार,  महिला आघाडी प्रदेश सचिव लता ढेरे, कार्याध्यक्ष तुषार जक्का, समन्वयक महेश कुलकर्णी,  संघटक दत्तात्रय बडगंची, विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील,  सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *