पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्यकारभाराने प्रजाहित दक्षतेचा आदर्श घालून दिला – जिल्हाध्यक्ष संतोष पवार…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.३१ मे
जात, पात, धर्म, पंथ, प्रांतांच्या सीमा ओलांडून संपूर्ण देशात सामाजिक कार्य पार पाडण्यात आपलं संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या तसंच देशभर रस्ते, देऊळ, विहिरी, तलाव, नदीघाट, धर्मशाळेसारख्या सुविधा निर्माण करून लोकोपयोगी कामांना कायम प्राधान्य देणाऱ्या प्रजाहीतदक्ष राज्यकर्त्या, कर्तृत्ववान तसेच कार्यक्षम शासनकर्त्या, राष्ट्रनिर्मात्या, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी नगरसेविका नुतन गायकवाड यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनता सुखी, समाधानी व सुरक्षित रहावी, सामान्य माणसांना न्याय मिळावा यासाठी राज्यकारभार केला. अहिल्यादेवींनी केलेला राज्यकारभार हा प्रेरणा देणारा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभाराने प्रजाहितदक्षतेचा आदर्श घालून दिला आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, जेष्ठ नेते श्रीनिवास कोंडी, हेमंत चौधरी, जनरल सेक्रटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सलिम नदाफ, अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव फारूक मटके, अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.