राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे सोलापूर दौऱ्यावर…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात मेळाव्याचे आयोजन – जिल्हाध्यक्ष संतोष पवार
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर / प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष संघटन वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे महाराष्ट्र दौरा करत असून त्याच पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर येत असल्याची माहिती पार्टीचे शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रवादी भवन कार्यालयात दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधी संबोधित करणार आहेत. असे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष जुबेर बागवान , जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा, हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख , कार्याध्यक्ष चित्रा कदम,युवक अध्यक्ष सुहास कदम, सेवादल विभाग अध्यक्ष प्रकाश जाधव ,आदिसंह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.