राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे उद्या सोलापूर दौऱ्यावर..
विविध कार्यक्रमातून साधणार युवक – युवतींशी संवाद
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि. २६ सप्टेंबर – राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशान्वये आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे हे महाराष्ट्र दौरा करत असून शुक्रवार दिनांक २७-०९-२०२४ रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी युवक – युवती सेलच्या पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांचे सकाळी ७वा.सोलापुरात आगमन होईल. तदनंतर दिवसभराच्या नियोजनास सुरुवात सकाळी ८ वा.ग्रामदैवत शिवयोगी श्री सिधदेश्वर मंदिरात दर्शन – सकाळी ९:३० वा.उमाबाई श्राविका प्रशाला{ सम्राट चौक } स्वाक्षरी मोहीम युवती संवाद – सकाळी १० वा. संगमेश्वर कॉलेज होय आम्ही सक्षम ,आपल शासन भक्कम “युवती युवक संवाद”-सकाळी ११ वा. बुर्ला कॉलेज आम्ही सक्षम ,आपल शासन भक्कम “युवती युवक संवाद”- सकाळी ११:४५ वा.छत्रपती शिवाजी सायं.वाणिज्य महाविद्यालय आम्ही सक्षम ,आपल शासन भक्कम “युवती युवक संवाद”- दुपारी १२ वा. दयानंद कॉलेज भवानी पेठ आम्ही सक्षम ,आपल शासन भक्कम “युवती युवक संवाद”- दुपारी २ वा.धनराज गिरजी नरसिंग कॉलेज मुरारजी पेठ आम्ही सक्षम ,आपल शासन भक्कम “युवती युवक संवाद”- दुपारी ३ वा.राखीव – दुपारी ४ वा.प्रमुख पदाधिकारी भेट – सायंकाळी ५ वा.युवक – युवती कार्यकारिणी बैठक – सायंकाळी ६ अक्कलकोट { श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास रवाना} – सायंकाळी ७ वा.श्री स्वामी समर्थांचे दर्शन { अक्कलकोट }- सायंकाळी ८ वा.अक्कलकोट हून सोलापूरकडे रवाना { मुक्काम}
या सर्व कार्यक्रमाचे पूर्व नियोजन जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वात व युवक – युवती सेलच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते प्रदेश पदाधिकारी विधानसभा अध्यक्ष कार्याध्यक्ष महिला आघाडी सर्व फ्रंटल व सेलचे अध्यक्ष – कार्याध्यक्ष सोलापूर शहर कार्यकारणी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.