माजी आमदार राजन “मालक” पाटील यांचा राष्ट्रवादीच्या वतीने विशेष सत्कार….!
“मोहोळचे मालक” या नावाचा सोलापुरी स्टाईलने राजन मालकांना अनोखा भरजरी फेटा बांधून भव्य पुष्पहार घालून विशेष सन्मान…!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २९ सप्टेंबर – राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नाव विकासाभिमुख नेतृत्व माजी आमदार राजन “मालक”पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केली. खऱ्या अर्थाने निष्ठावंत कार्यकर्त्यांला अजित पवारांनी न्याय दिला. राजन पाटील यांच्या या निवड प्रक्रियेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जेष्ठ नेते हेमंत चौधरी , व्ही. , व्ही. पी .कॉलेज चे अमोल चव्हाण , जिल्हा दूध संघ चेअरमन दीपक माळी , अनिल कादे , माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड ,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे आदींनी माजी आमदार नुतन राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन “मालक” पाटील यांना “मोहोळचे मालक” हा भरजरी फेटा बांधून शाल पांघरून भव्य पुष्पहार घालून भव्य सत्कार केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार , प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव ,कार्याध्यक्ष जुबेर बागवान,जेष्ठ नेते हेमंत चौधरी,माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे यांनी माजी आमदार राजन पाटील यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी माणिक कांबळे,वसंत कांबळे ,महादेव राठोड यांची उपस्थिती होती…