संजीव मोरे यांच्या कार्याचे झाले चीज ; शहर अल्पसंख्यांक कार्याध्यक्षपदी नियुक्ती..
तर राष्ट्रवादी शहर संघटकपदी श्रीशैल कलशेट्टी
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १७ जुलै – सोलापूर शहर अल्पसंख्यांक विभागात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखालील सोलापूर शहर अल्पसंख्यांक समन्वयक म्हणून काम करीत असलेले संजीव मोरे यांच्या कार्याचे अखेर चीज झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ख्रिश्चन समाजातील बांधवानी आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीनी मोरे यांना त्यांच्या कार्याची दखल घेत शहर कार्याध्यक्षपदी संधी देण्याची मागणी केली होती.
संजीव मोरे यांचे पक्षातील केलेले काम तसैच ख्रिश्चन समाजाची मागणी लक्षात घेता अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष इद्रीस नाईकवाडी तसेच कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी संजीव मोरे यांची अल्पसंख्यांक शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली त्याच बरोबर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर संघटकपदी श्रीशैल कलशेट्टी यांची निवड करण्यात आली यांचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी भवन येथे अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
दरम्यान याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण प्रा.श्री.कोंडी सर जनरल सेक्रटरी प्रमोद भोसले अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमीर शेख नारायण काका शिंदे प्रकाश जाधव रुपेश भोसले आशुतोष नाटकर संगीता जोगधनकर प्रिया पवार कांचन पवार संजीव मोरे,तुषार जक्का, अक्षय आवार,प्रशांत गुंडला, नरेंद्र, दशरथ शेंडगे, प्रकाश जाधव, शामराव गांगर्डे,अमोल कोठीवाले, प्रकाश झाडबुके, पवन पाटील, श्रीशैल कलशेट्टी, रवी कोरे, डाॅ संदीप माने डॉ,निलेश खंडागळे,डॉ कैलास आनीयपनवर, डॉ गौरी कुलकर्णी, डॉ, महेश दुलंगे,डॉ अनिल भाकरे डॉ,राजीव पटनी,डॉ.विना कात्रे,डॉ.अंजली वसगडेकर डॉ,हरिश्चंद्र गलियाल डॉ,अमित नीलगार,समदानी मतेखाने,जहीर शेख,मोईन मुल्ला,अश्फाक कुरेशी,निराकार अंतवार, जयकुमार चाबुकस्वार,जकण्णा बिराजदार,जॉन दिनकर,शांतराज जंगम,सचिन पाठवे,रवींद्र कोरे, आनंद साखरे आदी उपस्थित होते.