ईच्छा भगवंताची परिवाराकडून पार्थ पवार यांचा तुलभार करत वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२२ मार्च
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसा निमित्त सोलापूर येथील ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांच्या वाढदिनी अनोखा उपक्रम राबवत, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील पुस्तकांचे पार्थ पवार यांचा तुलाभार करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी हा उपक्रम पार पाडला. या सत्कार सोहळ्याप्रसंगी खा. सुनेत्रा अजित पवार, राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक सुरेश पालवे, सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार,उदय माने,
मोहित नायडू, सोलापूर राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस अमोल जगताप, राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे राष्ट्रवादी शहर संघटक हुलगप्पा शासम,शहर संघटक ऋषी येवले, लखन जाधव मुंबई,दीपक आरगेल, महादेव राठोड, आनंद गावडे, यांच्यासह ईच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य आदींची उपस्थिती होती.