बारामतीत राष्ट्रवादीची जनसन्मान रॅली ; शेकडो कार्यकर्त्यांसह किसन जाधव सोलापुरातून बारामतीकडे रवाना

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसन्मान रॅलीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पाठबळ मिळेल:-प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव…

 

सोलापूर दि १४ जुलै – लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रविवार १४ जुलै रोजी बारामती येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवारी जनसन्मान रॅली ही आयोजित करण्यात आली आहे. ही रॅली पक्षाच्या कार्यकर्त्यांना भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाचा संदेश देणारी ठरणार आहे. या रॅलीत राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नवनिर्वाचित राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल पटेल यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

                       

           दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना पाठबळ मिळावे या दृष्टीने जनसन्मान रॅलीचे बारामती येथे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून सोलापुरातून बारामतीकडे रवाना झाले.

                   यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव, महिला शहर समन्वयक शशिकला कसपटे, राष्ट्रवादी महिला मध्य विधानसभा कार्याध्यक्ष शोभा गायकवाड, शहर महिला सरचिटणीस संगीता गायकवाड शहर महिला उपाध्यक्ष सरोजनी जाधव, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, दक्षिण सोलापूर तालुक्याचे राजेश देशमुख, राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, दशरथ शेंडगे देशमुख, नागराज गायकवाड, अमोल जगताप,नईम अड्डेवाले, विवेक स्वामी करण निकम माऊली जरग, किरण शिंदे, सोनू पटेल, दिनेश आवटी, संतोष गायकवाड, ऋषभ प्याटी, सचिन जाधव, साद मुलाणी, मयूर सलगर, सक्षम मंगळवेढे, जय पतंगे, अंबादास गायकवाड, व्यंकटेश बिटला, शशिकांत पल्ली, उमेश राठोड, महेश गायकवाड, ओमकार पल्ले, संजय सांगळे, लखन कांबळे, हुलगप्पा शासम, वसंत कांबळे आदी कार्यकर्त्यांसह इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी सदस्य आदींची उपस्थिती होती.

येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना पाठबळ मिळावे, या दृष्टीने महत्त्वाचे संदेश देण्यासाठी पक्षाचे ध्येयधोरणे, पक्ष मजबुतीकरण, अशा अन्य विषयांवर या मार्गदर्शन मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि प्रमुख नेते पदाधिकारी हे मार्गदर्शन करणार आहेत जनसन्मान रॅली ही कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करेल, सध्या आषाढीची विठ्ठलाची वारी सुरू आहे आता साक्षात बारामती येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बारामतीची पंढरी असा हा मेळावा होणार आहे.

किसन जाधव , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *