किसन भाऊंची घरवापसी परंतु संतोष पवारांसह जुबेर बागवानचा विरोध
घर का ना घटका अशी झाली अवस्था

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि २९ डिसेंबर
राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली असून सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.चार दिवसांपूर्वी मध्यरात्री भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोन माजी नगरसेवकांच्या घरवापसीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
भाजपकडून उमेदवारी निश्चित नसल्याने हे दोन्ही माजी नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात परतण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे महत्त्वाची बैठक सुरू आहे. मात्र या घरवापसीला शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे.
या दोन्ही माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिल्यास आम्ही पदाचा राजीनामा देऊ, अशी आक्रमक भूमिका संतोष पवार आणि जुबेर बागवान यांनी घेतल्याची माहिती आहे. यामुळे ही घरवापसी सध्या रडखडलेली असल्याचं चित्र आहे.
मात्र या दोघांच्या घरवापसीमुळे आता शिवसेना शिंदे गट याची देखील एन्ट्री झाली आहे. कारण या दोन्ही माजी नगरसेवकांना प्रवेश दिल्यास याचा परिणाम शिवसेना राष्ट्रवादी या दोन्ही पक्षावर होणार आहे.
आता या संपूर्ण पेचप्रसंगातून मंत्री दत्तात्रय भरणे नेमका कोणता मार्ग काढतात, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
शितल गायकवाड यांच्या आत्मदाहनाच्या इशाराने झाली गोची
प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपकडून इच्छुक असणारे शितल गायकवाड यांनी आपल्याला उमेदवारी मिळणार असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपला आत्मदहनाचा इशारा दिल्याने किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांची गोची झाल्याचे सांगण्यात येत आहे.