मौलाना इब्राहिम कासमी‎ (सदर)‎ चा‎ भावनिक संदेश-किसन‎ जाधव-नागेश गायकवाड यांच्या‎ कार्याने‎ मुस्लिम‎ समाजात उजळली‎ एकतेची‎ ज्योत

सर्व समाजांच्या‎ ऐक्यासाठी एक पाऊल,‎ किसन‎ जाधव-नागेश गायकवाड‎ यांच्या‎ पुढाकारातून‎ जन्नतुल‎ फिरदोस‎ कब्रस्तान‎ सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन‎ मोठ्या‎ थाटात‎ संपन्न…

मौलाना इब्राहिम कासमी‎ (सदर)‎ चा‎ भावनिक संदेश-किसन‎ जाधव-नागेश गायकवाड यांच्या‎ कार्याने‎ मुस्लिम‎ समाजात उजळली‎ एकतेची‎ ज्योत

अल्पसंख्यांक‎ समाजासाठी जाधव-गायकवाड यांचे‎ मोलाचे‎ योगदान; सर्वसमावेशक नेतृत्वाचे नजीब‎ मुल्ला यांचे‎ कौतुक

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर‎, दि.११ नोव्हेंबर 

राष्ट्रवादी‎ काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष‎ व राज्याचे‎ उपमुख्यमंत्री‎ अजित पवार‎ यांच्या‎ निधीतून सोलापूर महानगरपालिका प्रभाग‎ क्रमांक‎ २२‎ मध्ये‎ ‘जन्नतुल‎ फिरदोस‎ कब्रस्तान सांस्कृतिक‎ भवन’‎ उभारणीच्या‎ कामाचे‎ भूमिपूजन‎ दिमाखात पार पडले.‎ हा‎ सोहळा‎ राष्ट्रवादी‎ काँग्रेस‎ पार्टीचे‎ महाराष्ट्र‎ प्रदेश‎ सरचिटणीस, अल्पसंख्यांक‎ विभाग निरीक्षक,‎ ठाणे महानगरपालिकेचे माजी‎ गटनेते तसेच कोकण बँकेचे संचालक‎ नजीब‎ मुल्ला‎ यांच्या‎ हस्ते‎ फीत‎ कापून संपन्न‎ झाला.

या‎ प्रसंगी शहर काजी जनाब‎ अमजद‎ सय्यद साहब,‎ अब्दुल राफे (अहेल‎ हदिस), मौलाना‎ इब्राहिम‎ कासमी सदर,‎ शहा इकबाल‎ हुसेन दुर्वेश, हाजी मकबूल मोहोळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर‎ जिल्हाध्यक्ष संतोष पवार,‎ कार्याध्यक्ष जुबेर‎ बागवान, जन्नतुल‎ फिरदोस मुस्लिम‎ कब्रस्तान ट्रस्टचे‎ अध्यक्ष पैगंबर इमाम‎ शेख, माजी नगरसेवक‎ तौफिक‎ शेख, माजी‎ स्थायी‎ समिती सभापती रियाज‎ हुंडेकरी, प्रदेश‎ उपाध्यक्ष तथा‎ माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे,‎ गणेश पुजारी,‎ रियाज खैरादी, माजी‎ नगरसेविका‎ नूतन प्रमोद गायकवाड, प्रदेश‎ सचिव इरफान शेख, अल्पसंख्यांक‎ आयोग सदस्य‎ वसीम बुराण,‎ माजी‎ परिवहन‎ समिती‎ सभापती आनंद मुस्तारे, फारुख‎ मटके, रियाज‎ शेख, सायरा‎ शेख,‎ शिपन‎ शेख,‎ युसुफ‎ पठाण, जमीर‎ मुल्ला,‎ शहाजान‎ शेख, जाकीर‎ कवठेकर,‎ सिकंदर‎ शेख, कोशन कुरेशी,‎ फारूक बागवान,‎ अहमद‎ कासिम‎ आळगी‎ यांच्यासह‎ शहरातील‎ अनेक‎ मान्यवर,‎ धार्मिक नेते व‎ समाजसेवक उपस्थित‎ होते या महत्त्वाकांक्षी‎ प्रकल्पासाठी‎ ५० लाख‎ रुपयांचा निधी‎ नगरसेवक‎ व‎ प्रदेश‎ उपाध्यक्ष किसन‎ जाधव‎ आणि‎ नगरसेवक‎ नागेश‎ गायकवाड यांच्या‎ विशेष‎ प्रयत्नातून‎ मंजूर करण्यात‎ आला‎ आहे.

प्रास्ताविक करताना‎ किसन जाधव म्हणाले, सोलापूर‎ महानगरपालिकेवर गेल्या‎ तीन‎ वर्षांपासून प्रशासकीय‎ राजवट असल्याने‎ नागरिकांना मूलभूत‎ सुविधांचा‎ अभाव भासत आहे.‎ या पार्श्वभूमीवर‎ उपमुख्यमंत्री‎ अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील‎ तटकरे‎ यांच्या मार्गदर्शनाखाली‎ प्रभाग‎ २२‎ च्या‎ सर्वांगीण‎ विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा‎ निधी‎ मंजूर झाला‎ आहे.‎ अल्पसंख्यांक, मोची, गवळी, मराठा, लिंगायत‎ अशा सर्व‎ समाजांसाठी सांस्कृतिक‎ भवन‎ उभारणीची कामे सुरू‎ असून ती लवकरच‎ पूर्ण‎ होतील.‎ पुढील काळात‎ आणखी‎ निधी‎ मिळवून प्रभागाचा‎ दर्जेदार विकास‎ साधणार‎ आहोत असे‎ त्यांनी‎ सांगितले. यावेळी‎ बोलताना मुस्लिम समाजाचे‎ धर्मगुरू मौलाना इब्राहिम कासमी म्हणाले‎ की किसन‎ जाधव आणि नागेश‎ गायकवाड यांच्या कार्याने‎ मुस्लिम समाजात‎ एकतेची‎ ज्योत पेटले‎ आहे.‎ मुस्लिम‎ समाजाच्या कल्याणासाठी‎ कार्य करणाऱ्या‎ जाधव आणि‎ गायकवाड‎ यांचे कार्य‎ कौतुस्कास्पद असल्याचे‎ ते‎ म्हणाले.‎ यावेळी प्रमुख‎ पाहुणे‎ म्हणून बोलताना‎ नजीब‎ मुल्ला म्हणाले,किसन जाधव‎ आणि नागेश गायकवाड‎ हे‎ जातीभेदाच्या पलीकडे‎ सर्वसमावेशक विकासाचे‎ उत्तम उदाहरण‎ आहेत. सर्व‎ समाजांना एकत्र आणून विकासाची‎ दिशा देणे हे‎ त्यांच्या‎ नेतृत्वाचे वैशिष्ट्य‎ आहे.‎ उपमुख्यमंत्री‎ अजित‎ पवार यांच्या माध्यमातून कब्रस्तानाचा‎ वॉल, कंपाऊंड,‎ रस्ता‎ तसेच अल्पसंख्यांक‎ समाजाच्या‎ इतर गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील‎ राहू अशी ग्वाही‎ त्यांनी दिली.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार‎ किसन जाधव, नागेश‎ गायकवाड आणि युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड‎ यांच्या‎ हस्ते करण्यात‎ आला. मोठ्या थाटात‎ संपन्न‎ झालेल्या‎ या भूमिपूजन‎ सोहळ्यास प्रभागातील‎ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित‎ राहून जाधव‎ -‎ गायकवाड‎ यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या‎ संकल्पनेला‎ उत्स्फूर्त‎ प्रतिसाद‎ दिला.

या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक‎ २२‎ मध्ये‎ सामाजिक‎ ऐक्य,‎ सांस्कृतिक‎ प्रगती‎ आणि सर्वसमावेशक विकासाची‎ वाट अधिक‎ बळकट‎ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *