ओबीसी प्रवर्गाच्या हिताचे निर्णय ओबीसी समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करावे :- प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.८ मार्च
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली ओ.बी सी. विभागाच्या वतीने राज्यात संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२२ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत या संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ओ.बी.सी.विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. या अभियानाचे उद्घाटन करण्यासाठी तसेच पक्ष संघटन वाढीसाठी संपर्क अभियानच्या माध्यमातून राज्यभर दौरा करत आहेत.

दरम्यान, ओ. बी.सी.सेल विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, संपर्क अभियानाच्या माध्यमातून राज्यभर दौरे करत असून राज्यभर ओ.बी.सी. समाज पक्षासोबत सोबत जोडला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या ओबीसी प्रवर्गाच्या हिताचे घेत असलेले निर्णय व भूमिका ओबीसी समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी करावे. ओबीसीतील संख्येने अतिशय अल्प असलेल्या जात घटकांपर्यंत पोहोचून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत.असे सांगत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व जिल्हा परिषद निवडणूकांच्या दृष्टिकोनातून संघटन वाढीसाठी प्रत्येकाने पूर्ण ताकदीने आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.
तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकात सेल विभागाचे अध्यक्ष अनिल छत्रबंद यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. जिल्हाध्यक्ष मोतीराम चव्हाण यांनी स्वागत केले. तदनंतर उपाध्यक्ष किसन जाधव व शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्ष संघटन वाढीसाठी प्रत्येकाने विश्वासाने सोपावलेल्या जबाबदारीचे भान राखून व जबाबदारी समजून सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान,प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे जेष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, प्रदेश सरचिटणीस शशिकांत बापू कांबळे, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.