राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापूर शहर युवक शहराध्यक्षपदी सरफराज शेख यांची निवड…
सोलापूर व्हिजन न्युज नेटवर्क,
सोलापूर, दि.११ जून
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नूतन सोलापूर शहर अध्यक्षपदी सरफराज शेख यांची निवड करण्यात आली आहे. सदरील निवडीचे पत्र प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्याहस्ते युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार, प्रांताध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते पाटील, रोहित पवार , शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मान्यतेने युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी ही निवड केली. निवडीचे पत्र देताना प्रदेश सचिव ट्वीनकल परमार,सचिन नारकर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, गब्बर सय्यद, नूर नदाफ आदी उपास्थित होते.
दरम्यान, मागील दोन वर्षाचा कार्याध्यक्ष चा कार्यकाळ पाहता त्यांना शहराध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निष्ठावन्त कार्यकर्ता म्हणुन त्यांची ओळख आहे.
सोलापुरातील पक्षाचा एक युवक चेहरा म्हणुन त्यांचा नाव नेहमी चर्चेत असते. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी ते सक्षम पणे सांभाळत आहेत शांत संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना, आंदोलनातून तयार झालेला तसेच जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांनी अनेक आंदोलने उभे केले, जनसामान्यांचे प्रश्नांसाठी ते नेहमीच आवाज उठवत असतात, महागाई, बेरोजगारी, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, नीट घोटाळा, केंद्र व राज्य सरकार विरोधातील तसेच अनेक स्थानिक मुद्द्यांवरचे आक्रमक आंदोलने हे नेहमीच लक्षवेधी ठरलेले आहेत तसेच मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी अहोरात्र झटून काम केले.
अनेक युवक व नेते पक्ष सोडून जात असताना ते पक्षाशी, प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले. सध्या पक्ष सत्तेत नसल्यामुळे, रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे, अशा स्थितीत सरफराज शेख यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी देत विश्वास टाकला आहे. येणाऱ्या काळात पक्ष संघटना मजबूत करण्याचा विश्वास यावेळी सरफराज शेख यांनी व्यक्त केला.