माजी नगरसेवक तौफक शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ;
राष्ट्रवादी शहरच्या वतीने जंगी स्वागत…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१४ मे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री दत्ता भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे माजी नगरसेवक तौफीक शेख, माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी, माजी नगरसेवक वहिदा शेख, माजी नगरसेवक नूतन गायकवाड, माजी नगरसेवक तस्लिम शेख, ऍड वसीम शेख, आसिफ राजे, युनूस शेख, यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीभवन येथे स्वागत सत्कार केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार म्हणाले, पक्षातील सर्व सहकारी आपल्याला सोबत घेऊन महापालिका निवडणुकीमध्ये एक यशस्वी कामगिरी करून अजित पवार यांचे हात बळकट करूयात आपण पक्षात येण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अधिकची वाढलेली असून पक्षाचे ध्येय धोरण जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण सक्रिय व्हाल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी तौफिक शेख हे पक्षात आल्याने पक्षाची ताकत वाढलेली आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत निश्चित याचा फायदा पक्षाला होईल, त्यांच्या सोबत आलेल्या सहकाऱ्यांचे स्वागत करत असल्याचे सांगितले.
अजित पवार हे सर्व समाजघटकाला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व असल्याने मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला येणाऱ्या काळात जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान व राष्ट्रवादीचे शहरातील सर्व पदाधीकारी यांच्या सोबतीने महापालिका निवडणुकीत अजित पवार यांचे नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज माझा व माझ्या सर्व सहकार्यांचे स्वागत व सत्कार केलात याबद्दल आपले मनापासून धन्यवाद मानतो असे उद्गागार तोफिक शेख यांनी काढले.
याप्रसंगी महिला अध्यक्ष संगीता जोगदंडकर, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव फारुख मटके, प्रकाश जाधव, ओबीसीं प्रवेश उपाध्यक्ष सलीम नदाफ, ओबीसी प्रदेश सरचिटणीस बसवराज बगले आदीसह पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते