राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आनंद चंदनशिवे..!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले नियुक्तीपत्र..!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ०३ ऑक्टोंबर – सोलापुरातील आंबेडकरी चळवळीतील आक्रमक कार्यकर्ता, माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांची अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे नियुक्ती पत्र दिले आहे.पक्षाच्या वाढीसाठी आणि पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य राहील. असे पत्र खा.प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते सहीनिशी प्रदान करण्यात आले आहे.
दरम्यान नियुक्ती पत्र प्रदान करतेवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, आदीं उपस्थित होते.
पक्षाने दिलेले जबाबदारी सार्थ ठरवणे..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी मी सार्थ ठरवेन, पक्ष वाढीसाठी समाज उपयोगी कार्य करत राहीन. माजी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य पार पाडले आहेत. भविष्यात देखील आणखीन कामे करत राहू. अजितदादा यांना मुख्यमंत्री बनवण्याचे मोठे कार्य या माध्यमातून करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
– आनंद चंदनशिवे, नूतन प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.