राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या मागणीला यश ;
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सोलापूर ते नागपूर विशेष रेल्वे धावणार..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. १० ऑक्टोंबर – धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सोलापूर तसेच महाराष्ट्रसह व भारत देशातील लाखो भीमसैनिक नागपूर येथील दीक्षाभूमी वंदन करण्यासाठी जात असतात. यानिमित्त भीमसैनिकांच्या सोयीकरिता सोलापूर ते नागपूर विशेष ट्रेन ची सोय करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी मध्य रेल सोलापूर वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांना सोलापूर ते नागपूर विशेष रेल्वेची मागणी करण्यासाठी निवेदन दिले असता वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी सोलापूर ते नागपूर दरम्यान विशेष रेल्वेगाडीची सोय केल्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी मध्य रेल सोलापूर वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
दरम्यान सोलापूर नागपूर आरक्षित विशेष एक्सप्रेस गाडी क्र.०१०२९ विशेष दि. ११ रोजी सोलापूर येथून संध्याकाळी ६ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. गाडीचे थांबे सोलापूर, कुर्डवाडी, दौंड, अहमदनगर ,बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, धामणगाव ,पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, सिंदी, अजनी आणि नागपूर. गाडीची संरचना याप्रमाणे असणार आहे. या रेल्वेत तृतीय श्रेणी वातानुकुलित, ८ शयनयान, ६ जनरल , २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह एकूण १८ डबे आहेत.