सोलापुरातील प्रशासकीय समस्यांचे निराकरण करण्याच्या मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांचा पुढाकार
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२८ मार्च
राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये सोलापूर शहरातील विविध समस्या बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी या बैठकीमध्ये सोलापूर महानगरपालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यामाध्यमातून दैनंदिन होणाऱ्या प्रशासकीय कामकाजाबद्दल व नागरिकांच्या सोई सुविधाबद्दल प्रामुख्याने विषय मांडण्यात आले.
बैठकीदरम्यान मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्नाबाबत सहकार्य करा, नागरिकांना विविध सोयीसुविधा कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल याबाबत योग्य त्या सूचना दिल्या. सदरच्या बैठकीस माजी नगरसेवक गणेश पुजारी, अविनाश भडकुंबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर शहरातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी बैठक…
सोलापूर शहरातील महापालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांविषयी आणि प्रलंबित प्रश्नांविषयी बैठक घेण्यात आली. महापालिकेच्या अंतर्गत असणारे रमाई आवास योजना, महापालिका रोजंदारी बिगारी कामगार, क्रीडा संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, माता रमाई पुतळा सुशोभीकरण, जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील संजय गांधी निराधार योजना, नॉर्थकोट मैदान येथील बाबासाहेब आंबेडकर स्मारक आदींचे विषय चर्चेत आणले. डीपीसी मधून विविध प्रलंबित कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याविषयी मागणी यावेळी करण्यात आली.
– आनंद चंदनशिवे, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा माजी नगरसेवक